हिमायतनगर तालुक्यातील शिवसंपर्क अभियानाला सिरंजनीतुन सुरूवात - NNL

जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ कोकाटे, माजी आमदार नागेश पाटिल आष्टीकर यांची उपस्थिती 



हिमायतनगर,अनिल नाईक| खा. हेमंत पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ कोकाटे, माजी आमदार नागेश पाटिल आष्टीकर, यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सिरंजनी येथुन शिवसंपर्क अभियानाला सुरूवात करण्यात आली. यावेळी  येथे शिवसेना शाखा फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कोविड १९ काळात सर्व सामान्य लोकांना काही अडीअडचणी आल्या असतील, काहिनी कोरोनाचे उपचार घेवुन दवाखाण्याचे बिल अदा करण्यात व्यत्य आला असेल, कोरोना लसीकरण करून घेण्यात काही गैरसमज असतील, अन्य काही अडचणी असतील या विषयी शिवसेने कडुन शिवसंपर्क अभियान महाराष्ट्रभर सुरू आहे, तसेच गाव तिथ शाखा, शाखा तिथ पाटी लावण्याचा उपक्रम सुरू आहे. तालुक्यातील गट व पंचायत समिती गण सिरंजनी, सरसम, दुधड, कामारी, गटात गणात अभियानाच्या अनुषंगाने बैठका घेण्यात आल्या, पहिली बैठक सिरंजनीत संपन्न झाली, त्यानंतर सरसम, दुधड कामारी येथे बैठका पार पडल्यात.

हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथून शिव संपर्क अभियानाला सुरुवात झाली असून सिरंजनी येथिल मुख्य चौकात शिवसेना शाखेच्या उद्घाटन फलकाचे अनावरण मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर जिल्हाप्रमुख दत्ता भाऊ कोकाटे, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, शाम पाटिल, युवासेनेचे विशाल राठोड, किसान सेनेचे प्रकाश जाधव, माजी सरपंच सत्यवृत्त ढोले, हदगाव विधानसभा संपर्क प्रमुख परमेश्वर पांचाळ, यांच्या हस्ते करण्यात आले. माजी सभापती विठ्ठलराव वानखेडे, तालुका संघटक संजय काईतवाड, खरेदी विक्री संघाचे संचालक बळीराम देवकते, विलास वानखेडे, अनिल भोरे, राम नरवाडे, ग्रा.प.स. गणेश राऊलवार, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, शहर प्रमुख प्रकाश रामदिनवार, माजी चेअरमन नामदेवराव उपलवाड, अवधुतराव पाटिल देवसरकर, उप जिल्हा प्रमुख उत्तमराव देवसरकर, राम नरवाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

उपस्थितांना जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ कोकाटे मार्गदर्शन करतांनी म्हणाले, गेल्या शिवसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पक्ष प्रमुख मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांची मुंबईत बैठक झाली. दि. २७ जुलैला साहेबांचा वाढदिवस असल्याने दि. १२ ते २४ दरम्यान महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान राबवण्याचा आदेश केला. गाव तिथ शाखा घर तिथ शिवसैनिक ह्या अजेंड्या प्रमाणे काम करायच आहे. भविष्यात निवडणुका होणार आहेत, कोरोना काळात कुणाच्या भेटी गाठी झाल्या नाहीत, लोकांशी संवाद साधुन अडीअडचनी समजुन घेण्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहचलो आहोत. मागच झाल गेल विसरून कामाला लागा शिवसेनेची ताकत वाढवा. असा सल्ला कोकाटे यांनी देवुन शिवसैनिकांना जनसंपर्क अभियान वाढवुन सदस्य नोंदणी पुर्ण करण्याचे पक्षाच काम वेळोवेळी करण्याच्या सुचना केल्या. दि. २३ पर्यंत सर्व कामे पुर्ण करून अहवाल सादर करण्याचे यावेळी सांगण्यात आले.

मार्गदर्शन करतांना आष्टीकर बोलले, माझ्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र राहुन गाव विकासाच्या दृष्टीकोनातुन करता येतील त्या मुलभुत सुविधा देण्याचा प्रयत्न केला, काही थोड्या अधिक चुकांमुळे तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करून आपली सिट गमावली, सिट लागली असती तर साहेब मुख्यमंत्री असतांना बऱ्याच योजना निधी आनता आल्या असत्या. आता जी कामे सुरू आहेत ती माझ्या काळातील सुरू आहेत. आता पर्यंत नविन टेंडर इस्टिमेट झाल नाही, आनखी वर्षभर तरी माझ्या काळातील कामे सुरू राहतील. कोणाच्या तरी भावनात्मक बोलण्याला बळी पडुन तुमच्या कडुन निर्णय चुकला, कामे निधी खेचुन आणन्यासाठी हक्काचा कोणी राहिल नाही. आगामी काळात जिल्हा परीषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या पक्षाची माणसे निवडुन आनने गरजेचे आहे. 

आपल हक्काच कोणी नसल तरी चालु आमदाराला २५-१५ चा निधी जेवढा मिळतो तेवढाच निधी आपल्या माध्यमातुन आणनार असल्याच आष्टीकर म्हणाले. भविष्यात देखिल जिल्हा परीषदेच्या निवडणुकीत आपल्यातीलच काही उचकुन देण्याच काम करतील. त्यांचे कडुन कान भरून घेवु नका, आपल्यातीलच काही घरभेदी असु शकतात. त्यांच्या घेऱ्यात जावु नका, भरकटुन चुकीचा निर्णय घेवु नका. मी आमदारकीला पडलो तरी पक्ष प्रमुख मुख्यमंत्री पदावर आहेत, खासदार हेमंत पाटिल आहेत, त्यांचे पर्यंत पत्र पोहचवण्यात आम्ही सर्वजन प्रयत्न करू. आपन केलेल्या कामाची पावती नक्कीच मिळणार आहे. मी तुमच्या सोबत असुन, आता सक्षम पणे कामाला लागलो आहे. पुर्वी पेक्षा जोमाने कामे चालनार आहेत, पुर्वी प्रमाणे सातत्याने सोबत राहुन जनसंपर्कात राहिल असा भावनिक शब्द उपस्थितांना आष्टीकरांनी दिला.

यावेळी पोतन्ना करेवाड, नामदेव आनेबोईनवाड, दिगांबर सिलेवाड, नागोराव पवार, देवराव गोलेवाड, मारोती सुर्यवंशी, बालाजी मंडलवाड, शंटी कप्पलवाड, सरपंच बाळा पतंगे, नागोराव सुर्यवंशी, शंकर चलमेलवार, यांची उपस्थिती होती. खासदार हेमंत पाटिल, माजी आमदार आष्टीकर यांच्यावर विश्वास ठेवुन सुभाष सिल्लेवाड, बाबु करेवाड, दत्ता मिस्त्री बमलवाड, रामा गोलेवार, निरंजन मॅकलवाड, रामा बोईनवाड, मारोती सिल्लेवाड, कौठा ज. सरपंच गौतम दवणे, नागेश दंतलवाड, मारोती सिल्लेवाड, नरेश आंबेपवाड, मधुकर राऊत, मारोती कवडे,  यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी