शिवसेनेचे संघटन नंबरवन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसेना सदस्य नोंदणी करा. - जिल्हाप्रमुख आनंदराव बोढारकर -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
नगरपंचायत निवडणुकीसाठी व शिवसेनेचे संघटन नंबर वन करण्यासाठी शहरातील प्रत्येक वार्डात मोठ्या प्रमाणात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवावे असे आवाहन शिवसेना शिवसंपर्क अभियानाच्या उदघाटन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोढारकर यांनी पदाधिका - यांना केले आहे. अर्धापूर शहर शिवसेना शिवसंपर्क अभियानाची सुरूवात दि .२१ बुधवारी रोजी करण्यासाठी हनुमान मंदिर सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

शिवसंपर्क अभियान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब देशमुख बारडकर ,उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील पांगरीकर , उपसभापती अशोक कपाटे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष कपाटे,शहरप्रमुख सचिन येवले,माजी जि.प. सदस्य नागोराव इंगोले,प्रल्हाद इंगोले,उपतालुका प्रमुख कैलास कल्याणकर, सदाशिव इंगळे,संतोष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज , शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी कोरोना महामारीत महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेले कार्य तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती जनते पर्यंत पोहचवावी व शिवसेना सदस्य नोंदणी शहरात मोठ्या प्रमाणात करावी असे आवाहन पदाधिकारी शिवसैनिकांना केले आहे.

या बैठकीत नागोराव इंगोले, बाळासाहेब देशमुख, प्रल्हाद इंगोले, संतोष कपाटे यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी उपतालुकाप्रमुख सदाशिव इंगळे, संतोष कदम, संतोष कल्याणकर, संभाजी देशमुख, भगवान पवार,ओम नागलमे,कपील कदम, संतोष कदम,कपील दुधमल,एकनाथ मोगरकर, होनाजी जोगदंड,हरी बारसे, नितीन राठोड यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक संयोजक शहरप्रमुख सचिन येवले यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव इंगळे यांनी तर आभार कैलास कल्याणकर यांनी मानले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची उपस्थिती होती.

मालेगाव येथे शिवसंपर्क अभियान ऊत्साहात


मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियान मालेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मालेगाव परिसरात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जुन्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला . शिवसंपर्क अभियान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर हे होते.तर माजी जि प सदस्य नागोराव इंगोले, उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील पांगरीकर,बारडचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख,उपसभापती अशोक कपाटे, तालुकाप्रमुख संतोष कपाटे,श्याम वानखेडे,उपतालुकाप्रमुख कैलास कल्याणकर, संतोष कदम,संभाजी देशमुख,चेतन देशमुख यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी ओमशांती ऑर्गेनिक गटाच्यावतीने सर्व मान्यवरांना सेंद्रिय हळद सदिच्छा भेट देण्यात आली,मालेगावात सर्वप्रथम शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन भगवी पताका उभी करणारे बाबुराव नामदेवराव इंगोले जळवांची बुट्टे,संग्राम काडवदे,गंगाराम देलमडे राजीव जोशी,देविदास इंगोले,भगत जाधव, बाबूराव कदम, मारुतराव कदम,आतम कदम, शिवाजीराव कदम, तुकाराम आवर्दे,यांचा सन्मान करण्यात आला. विश्वनाथ लिंगाप्पा सीमेवर संजय गणपतराव इंगोले, भुजंग तातेरा इंगोले अंकुश कल्याणकर,पप्पू श्यामराव सावंत,गणेश इंगोले, ज्ञानेश्वर सावंत, यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. यावेळी शिवशंकर पिंपळे शहाजी जाधव ललित पाताळे, गणेश डाखोरे,तुळशीराम कदम,सुदाम कदम,राजू कदम, पिंटू पाटील, भोगाव,संजय शिंदे बबन मुधळ कपिल कोंढेकर, अतुल पताळे,दीपक कदम धामदरीकर, प्रदीप पटेल, रामदास इंगोले, युवासेनेचे सचिन इंगोले, चंद्रकांत खराटे, सुधीर पाटील,ज्ञानेश्वर इंगोले,रखमाजी इंगोले, संदीप इंगोले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. ग्रामपंचायतच्या सदस्या सुनिता नागोराव इंगोले, प्रभावती दुर्गादास चौरे, मारोती कदम,भगत जाधव या लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी