शारदा कंट्राकशनच्या भोंंगळ कारभाराने हिब्बट मार्गे देगलुर बस सेवा पुर्णपणे बंद -NNL

 तांदळी येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान....


मुखेड, रणजित जामखेडकर|
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी व हिब्बट मार्ग देगलुर बससेवा तात्काळ सुरू करावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष गिरिधर पा.केरूरकर यांनी दिला आहे.

मुखेड तालुक्यातील मुखेड हिब्बट देगलुर रोडचे काम गेल्या एक वर्षापासून चालू आहे. शारदा कंट्रकशन ने रोड बनविण्यासाठी पुर्ण रस्ता उखडून सोडला असल्याने उखडलेल्या रस्त्यावर मजबूत मुरूम टाकुन व्यवस्थित दबई केली नसल्याने रस्त्यावर चिखल साचले आहे. यामुळे या मार्गावरून वाहतुक सेवा बंद आहे. एस.टी महामंडळाने बस फसुन बसल्याचे दाखला देऊन बस फेरी रध्द केल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या देगलूर, खानापुर,एकलारा, धनज,जामखेड, हिब्बट, मंडलापुर, बोरगाव, केरूर, जांभळी, मारोतीनगर तांडा, मुखेड या दरम्यान प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, कर्मचारी, जेष्ठ नागरिक, अपंग, अजारी व्यक्तींं सह सामान्य प्रवाशांना अक्षरशः पायदळ चालत प्रवास लागतो आहे.

शारदा कंट्रकशन कंपनी कडून तांदळी शिवारातील नदीवर पुलाचे काम चालु आहे. या पुलाच्या बाजुस वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून छोटा कच्चा पुल निर्माण केला होता. पुलाचे काम लवकर न झाल्याने पावसाळ्याच्या पाण्याचे अंदाज घेऊन हा पुल खुला न केल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शारदा कंट्रक्शन कंपनीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणी शेतकऱ्यांच्या नुसकानीचे महसूल विभागाकडून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला देण्यात यावा व या मार्गावरील बससेवा तात्काळ चालू करण्यासाठी तालुका प्रशासनाने या रस्त्यावर मजबूत मुरूम टाकून एसटी महामंडळास पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा या मार्गाची बससेवा त्वरित चालू करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार यांना अखिल भारतीय छावा संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील केरुरकर यांनी दिले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी