तरोडा येथील शिवसंपर्क अभियान व शिवसेना सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड। राज्याचे मुख्यमंत्री उदध्वजी ठाकरे यांचे विचार प्रत्येक घरा-घरात पोहंचवा. तसेच प्रत्येक घरात शिवसैनिक असलाच पाहिजे असे प्रतिपादन शिवसैना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी केले आहे. ते तरोडा येथील शिवसंपर्क अभियान व शिवसैना सदस्य नोंदणी कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती आ.बालाजी कल्याणकर, राजश्री हेमंत पाटील, संध्याताई बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, शहर प्रमुख सचिन किसवे, महानगर प्रमुख अशोक उमरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख माधव पावडे, महेश खेडकर, प्रकाश मारावार, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, डॉ. मनोजराज भंडारी, तालुकाप्रमुख जयवंत कदम, बाळासाहेब देशमुख, बलवंत तेलंग, गजानन कदम, सरपंच संघटनेचे नारायण कदम, महिला जिल्हाध्यक्ष डॉ.निकिता चव्हाण यांच्यासह आदिजन उपस्थित होते.
नांदेड उत्तर मतदार संघातील तरोडा परिसरातील शिवपार्वती मंगल कार्यालयात संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत, शिवसंपर्क अभियान व सदस्य नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी शिवसेना हि प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे, शिवसैनिक हा शिवसेनेचा कणा आहे. त्यामुळे शिवसैना सदस्य नोंदणी मोठया प्रमाणात करा, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
यावेळी गोदावरी अर्बनच्या संचालिका राजश्रीताई पाटील यांनी देखील सर्वांनी मिळून पक्षवाढीसाठी काम केले पाहिजे, कामाची पोचपावती हि मिळत असते. पक्षासाठी काम केल्यावर आपोआप पद मिळत असते, त्यामुळे आपण सर्वांनी आता जोमाने पक्ष वाढीच्या कामाला लागले पाहीजे असे प्रतिपादन केले आहे. तसेच नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना मी आपल्या प्रत्येक सुखा - दुखात सामील होतो, जर काही अडचणी असतील तर त्या मला सांगत चला. नांदेड उत्तर मतदारसंघात अनेक विकास कामे खेचून आणली आहेत.
आणि आगामी काळात देखील मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे आधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासून कामाला लागले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून कामे केली पाहिजे असे प्रतिपादन आ. बालाजी कल्याणकर यांनी केले आहे. या कार्यक्रमास शिवसेनेचे उप शहरप्रमुख, विभाग प्रमुख, सरकल प्रमुख, शाखा प्रमुख, जेष्ठ शिवसैनीक, महिला, युवावर्ग यांच्यासह आदीजण मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
यावेळी बालाप्रसाद शिंदे, सचिन पाटील नवघरे, सुनील पाटील पोपळे, प्रभु पाटील, माधव शिंदे, उत्तमराव कदम, किशोर गोरठकर, भिवाजी पोपळे यांच्या नेतृत्वामध्ये शिवराज शिंदे, श्रीकांत कदम, केशव कदम, परशुराम शिंदे, ओमकार लेडाळे, सखाराम बोकारे, ज्ञानेश्वर पोपळे, संजय पोपळे, गुलाब नरवाडे, दिलीप नरवाडे, धारबा पोपळे, अमोल पाटील, काशिनाथ पाटील, अशोक नरवाडे, यशवंत पाटील, मुंजाजी पाटील, शंकर नरवाडे, मुकुंद नरवाडे, अर्जुन पोपळे, दामोदर पोपळे, शिवराज शिंदे, केशव कदम, परशुराम शिंदे, राजेश कदम, संतोष कदम यांच्यासह आदीजणांनी शिवसैनेत प्रवेश केला आहे.