नांदेड| विष्णुपूरी प्रकल्पात पाण्याचा साठा ३५३.२५ मीटर झाला आहे. पाण्याची टक्केवारी ८५.५७ टक्के आहे. त्यामुळे प्रकल्पातील दरवाजा क्रमांक १४ दुपारी ३ वाजता उघडण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ५.४५ वाजता इतर पाच दरवाजे ज्यात दरवाजा क्रमांक ३, ४, ७, ११ आणि १३ हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून २४८४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गत तीन दिवसा पासुन जिल्हयासह सर्वदुर पाऊस सुरू असुन यामुळे धरणातील पाण्याचा येवा वाढला आहे, विष्णुपुरी धरणाचे टप्प्या टप्प्याने सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत, सहा दरवाज्यातुन २४८४ क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात होत आहे, नदी च्या खालच्या भागातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन प्रशान लक्ष ठेवुन आहे.
