अन्यथा आंदोलन करू पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचा विभागीय कृषी सहसंचालकांना इशारा.
नांदेड| सध्या कृषी विभागाच्या वतीने विभाग स्तरावरील बदल्यांचा हंगाम चालू झाला आहे,शासनाच्या नियमाप्रमाणे नागरी सेवा मंडळाने आज पासून लातूर येथे समुपदेशनद्वारे बदल्या चालू केल्या आहेत, नागरी सेवा मंडळाने बदल्या करते वेळेस नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना सारखा न्याय देऊन कृषी सहायक व पर्यवेक्षकांची बदल्या कराव्यात, विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांनी केवळ नांदेड मुदखेड अर्धापूर लोहा याच तालुक्यात पदांची भरती न करता नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये रिक्त पदे भरावेत त्या प्रमाणे बदल्या कराव्यात अन्यथा विभागीय कृषी सहसंचालक लातुर यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिला आहे
मागील अनेक वर्षांपासून एकाच नांदेड तालुक्यातून ठाण मांडून बसलेल्या कृषी सहायकांची इतरत्र बदली करावी नांदेड मुदखेड लोहा अर्धापूर या तालुक्यात सहा वर्ष नोकरी करणाऱ्या कृषी सहायकांना किनवट, देगलूर उपविभागीय कृषी कार्यालयातील तालुक्यात बदल्या कराव्यात, नांदेड शहराजवळच्या तालुक्यात ठाण मांडून बसलेल्याल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यक्षेत्रात बदली करावी जेणेकरून कृषी विभागांमध्ये काम करणाऱ्या इतर तालुक्यातील कर्मचाऱ्यांना इथे काम करण्यास वाव मिळेल एकाच तालुक्यात वर्षानुवर्ष काम करत असल्यामुळे इतर तालुक्यात रिक्त पदाची संख्या वाढत आहे.
त्यामुळे त्या तालुक्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण मोठ्या प्रमाणात पडत आहे,नांदेड शहरालगतच्या तालुके वगळता इतर तालुक्यात कृषी सहाय्यक यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत,सध्या चालू असलेल्या बदल्यांमध्ये नागरी सेवा मंडळ व विभागीय कृषी सहसंचालकांनी वैयक्तिक लक्ष घालून ठाण मांडून बसलेल्या कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षकाना दुसऱ्या तालुक्यात पाठवावे व बदल्यांमध्ये सर्वच तालुक्यातील रिक्त पदे समप्रमाणात भरून सर्वांना न्याय द्यावा,अन्यथा विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी निवेदनाद्वारे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
