माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला विकासाची दिशा दाखवली -


नांदेड|
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्राला विकासाची दिशा दाखवली विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारीने काम करतांना आघाडी सरकारचा भ्रष्टाचार पुरावे देवुन सिद्ध केला. असे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसा निमित्त नांदेड भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रवीण साले यांनी अभिष्टचिंतन करून त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.

भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढवून 123 आमदार निवडून आणले होते. त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली व शिवसेनेला सोबत घेवून सरकार चालविले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्राच्या कानाकोपर्यामध्ये विकास पोहोचवण्याचे काम केले. त्यामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना राबविण्यात आल्यामुळे सगळीकडे पाणी पातळीत वाढ झाली. तलाव रुंदीकरण केल्यामुळे अनेक भागात पाणी साठा वाढल्याने उन्हाळ्यातील अडचण दुर झाली. मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून अनेक गाव तांड्याला जोडणारे पक्के रस्ते तयार झाले. वृक्षारोपणसारखी महत्त्वाची जनचळवळ उभी करून महाराष्ट्रात करोडो वृक्षांची लागवड केली. 

उद्योग क्षेत्रात प्रगती करण्यासाठी नियम शिथिल करुन विदेशातील नवीन उद्योग महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. बुलेट ट्रेनचे महत्त्व लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले मुंबईची शांघाय करण्याची भाषा करणारे त्या साठी काहीच करू शकले नाही. पण आपण मेट्रो रेल्वे चा प्रकल्प सुरू करू लोकलला पर्याय उपलब्ध करून दिला. बुलेट ट्रेन साठी जापानशी करार करून ते कामदेखील सुरू करताना प्रयत्नाची पराकाष्ठा केली. तेेंव्हा काही राजकीय लोक याला विरोध करत होते जे आज सत्ते मध्ये येताच बुलेट ट्रेन ची भाषा बोलतात. समृद्धी हाय वे चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला तर जे विरोध करत होते तेच आज केवळ नाव बदलुन हेच काम परत करत आहेत. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकरी वर्गासाठी मराठवाडा वॉटर ग्रिड प्रकल्प सुरू केला. 

ठाणे पालघर जिल्ह्यातील पावसाचे वाहुन जाणारे 167 टिएमसी पाणी गोदावरी नदी पात्रात सोडुन गोदावरी नदीत बारमाही पाणी राहील आशी योजना तयार केली. मराठवाड्यातील कोरडवाहु क्षेत्र कमी करून सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले. पीक विमा देण्यासाठी आणेवारीत बदल करून शेतकर्यांच्या हितासाठी, शेतकर्यांना जास्तीत जास्त लाभ व्हावा असे नियोजन केले व विमा मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न केले. अनेक प्रकारच्या यशस्वी योजनांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची व शेतकरी बांधवांची सेवा केली. हे सर्व करत असताना त्यांच्या काळामध्ये त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे  भ्रष्टाचाराचे  आरोप झाले नाहीत. 

त्यामुळेच देवेंद्र फडणवीस आपल्या कामाच्या भरोशावर अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाले. त्यानंतर झालेल्या 2019 च्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांच्यामुळेच महाराष्ट्र मध्ये भाजप सेनेला बहुमत मिळाले परंतु देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता सहन न झालेल्या नेत्यांनी महाराष्ट्रात शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादी अशी अनैसर्गिक युती तयार करून सरकार स्थापन केले. तरी महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आजही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावे अशी भावना आहे. असे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी नांदेड तर्फे त्यांचे अभिष्टचिंतन व त्यांना निरोगी आयुष्य लाभो यासाठी मी देवाला प्रार्थना करतो.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी