सिडकोत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेच्या ५२ व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन -NNL



नवीन नांदेड| सिडको नवीन नांदेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिना निमित्य सिडको हडको येथील मातंग आणि बहुजन बांधव च्या सर्व पक्षीय आणि  संघटनांच्या वतीने नांदेड येथील  साहित्य रत्न लोकशाहीर कॉम्रेड डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

या वेळी विशेष उपस्थिती नां. वा. मनपा च्या नगरसेविका सौ. बेबीताई जनार्धन गुपिले यांच्या हस्ते क्रांती ध्वजारोहण करून मुख्य पुतळ्याला अभिवादन करण्यात आले या वेळी सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी क्रीडा शिक्षक जनार्धन गुपिले,सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष मरीबा बसवंते,माजी तलाठी  संभाजीराव बसवंते, दलितमित्र नारायणराव कोलंबीकर, निवृत्ती कांबळे, शाहीर गंगाधर वाघमारे, उद्योजक माधव डोम्पले, भीमशाहीर प्रा. गौतम पवार, शाहीर जमदाडे, भाकपा(युनायटेड)चे राज्याध्यक्ष तथा रयत सेवाभावी संस्थेचे संचालक प्रा.इरवंत सुर्यकार, भाकपा जिल्हामहासचिव प्रा. देवीदास इंगळे, प्रा.यशवंत गादेकर, सुजितकुमार निलकंठे, सहशिक्षक बालाजी पाटोळे, ज्ञानेश्वर डोम्पले, ज्ञानेश्वर ढाकनीकर, बाबू कांबळे,विलास वाघमारे, घाटे  ,केशव मेटकर, चंद्रकांत मेटकर, नितीन वाघमारे,आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी