हिमायतनगर| मृग नक्षत्राला पावसाच्या सरी बरसताच हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना गावामध्ये डोंगरावरील पावसाचे पाणी शिरल्याने गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, गावातील नाल्या तुंबल्यामुळे हा प्रकार झाला असल्याचे नागरिक आरोप करत आहेत. एकूणच या पुराच्या पाण्यामुळे गावकऱ्यांची दैना झाली असून, नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत आहेत.
पुराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले असून, गृहउपयोगी साहित्यासह अन्नधान्यचे नुकसान झाले आहे. हे नुस्कान होऊ नये म्हणून नागरिकांना स्वत: पाणी काढण्यासाठी नाल्यातुन वाट काढुन देण्याची वेळ आली असल्याचे पाहावयास मिळाले आहे. या प्रकाराकडे ग्रामपंचायतीच दुर्लक्ष झाल्यामुळे गावकर्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
गतवर्षी देखील जुलै महिन्यात अशीच परिस्थती निर्माण झाली होती. हि परिस्थिती यंदा निर्माण होऊ नये म्हणून गावाच्या बाजूच्या मळायचे सरळीकरण करून आणि गावातील नाल्याची सफाई पावसाळ्यापूर्वी करणे अनिवार्य होते. मात्र याबाबतीत ग्रामपंचायतीचा कर्तेपणा झाल्यामुळे मागील कित्येक दिवसापासून नाल्यातील केअर कचरा व गाळ काढला नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप नागरीक करत आहेत.