वाळकेवाडी येथील जि.प. शाळेच्या वाचनालयाची नासधूस; दस्तऐवजची झाली चोरी
हिमायतनगर| एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असल्याने सर्वसामान्य हवालदिल झाले आहे असे असताना दुसरीकडे चोरांनी नुसता उच्छाद मांडला आहे. आता तर चोरांनी शाळाना देखील लक्ष केले असून, तालुक्यातील वाळकेवाडी येथील जि.प. शाळेच्या प्रांगणात असलेले वाचनालय व कार्यालयांचे सेप्टी लॉक तोडून ऑफिसची खूप मोठया प्रमाणात नासदुस केली. एवढेच नव्हेतर शाळेचे काही मूळ दस्तऐवज लंपास केले आहे. हि घटना काल संध्याकाळी 9 च्या सुमारास घडली असा प्राथमिक अंदाज शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी वाळके यांनी व्यक्त केला.
याबाबत देण्यात आलेल्या तक्रारींव अर्जानुसार सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे वाळकेवाडी येथील जि.प. शाळेच्या प्रांगणात असलेले वाचनालय व कार्यालयांचे सेप्टी लॉक तोडून ऑफिसची खूप मोठया प्रमाणात नासदुस केली. चोरटयांनी शाळेचे काही मूळ दस्तऐवज लंपास केले आहे. हि घटना काल संध्याकाळी 9 च्या सुमारास घडली असून, नाव चोरीचे पण, मोठा घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी वाळके यांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून, चोरांना चोरीच करायची असती तर त्याने काही शाळेतील तांदूळ, डाळी कडधान्ये किंवा इतर वस्तु चोरी करून नेल्या असत्या. पण हे सर्व काही न नेता फक्त शाळेतील मुळ कागदपत्रे नेले. म्हणजे काही तरी मोठे गैर प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न तर नसावा. अशी शंका शाळेत त्यांनी उपस्थित केली आहे.
नेमके यात कोण कोण सहभागी आहेत त्यांना शोधून काढून या प्रकरणी दोषिवर कडक कारवाई करावी अशी मागणी गावातील शिक्षणप्रेमी लोक करत आहेत. विशेष म्हणजे या भागाचे आमदार यांचे मुळ गाव हाकेच्या अंतरावर असल्याने या प्रकरणी त्यांनी व्यक्तिगत लक्ष वेधून या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तानाजी वाळके व शाळेचे मुख्याध्यापक कोपनर यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्याला तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कदम हे करीत आहेत..