कोणीतरी याकडे लक्ष देतील का..शेतकरी, नागरिकांचा आर्त टाहो
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरापासून ते उमरखेडकडे जाणाऱ्या घारापुर पॉईंटपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला असून, या रत्स्याने चालताना जीव मुठीत धरून जात आहे. या रस्त्याला मंजुरी मिळाली असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात काम एखादा व्यक्ती खड्ड्यात पडून मेल्यानंतर सुरु केलं जाईल काय..? असा संतापजनक सवाल विचारला जात आहे.
हिमायतनगर तालुका हा हिंगोली लोकसभेअंतर्गत तर हदगाव विधानसभेत येतो, त्यामुळे मतदार संघातील अंतर्गत चाळणी झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था दूर करावी अशी या भागातील नेत्यांची आहे. मात्र सध्या तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्याकडे कोणत्याही नेत्यांचा लक्ष नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मराठवाड्यातील हिमायतनगर शहरातून - विदर्भातील उमरखेड शहराकडे जाण्यासाठी सोयीचा आणि जवळचा मार्ग बोरी, चाथरी, ब्राम्हणगाव हा आहे. या मार्गावर हिमायतनगर शहरापासून ते घारापुर ती पॉईंटपर्यंतचा रस्त्याची अक्षरशा चाळणी झाली आहे.
गेल्या दोन वर्षपासून या रस्त्याची अशी दयनीय अवस्था असताना याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे अल्पसा पाऊस झाला कि, या रस्त्यातील खड्ड्यात प्रचंड वाढ होत आहे. परिणामी रत्स्याने ये-जा करताना दुचाकीस्वार, शेतकरी, जीप, कारचे चालक व प्रवाशी जीव मुठीत धरून रस्ता केंव्हा संपतो याची वाट पाहतात. आजघडीला नुकत्याच झालेल्या पावसाने या रस्त्यावर अक्षरशः काही ठिकाणी तळे साचले आहे. तर या खड्डेमय रस्त्याने जाताना पुढील चांगला रस्ता गाठण्या अगोदर घसरगुंडी होऊन तळ्यात पोहावे लागेल कि काय अशी शंका चालकाला येते आहे.
मागील काळात हा रस्ता मांजर झाला अश्या वावड्या उठविण्यात आला. खरोखर रस्त्याला मंजुरी मिळाली असले तर रस्त्याचे काम का केले जात नाही..? असा प्रश्न या भागातील शेतकरी विचारीत आहेत. हा रस्ता इच्छापूर्ती वरद विनायक मंदिराकडे जात असल्याने दार महिन्याला चतुर्थी आणि इतर रोजी दर्शनासाठी ये - जा करणाऱ्या महिलांना अत्यंत त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याची कटकटी कधी संपणार अश्या शब्दात बोलत महिला मंडळींकडून राजकीय नेत्याच्या नावाने लाखोली वाहिली जात आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ या रस्त्याचे काम मार्गी लाऊन संभाव्य अपघात व एखाद्या व्यक्तीच्या निधनाची घटना होण्यापूर्वी खड्डेमय रस्त्यापासून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी केली जात आहे.