नांदेड| विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागात मृग नक्षत्राच्या अगोदर पासून पाऊस पडत आहे. त्यामुळे वरील पाण्याची पातळी वाढत असल्याने विष्णुपुरी प्रकल्प 100 टक्के भरला आहे. त्यामुळे तारीख 14 जून मध्यरात्री रात्री एक वाजता विष्णुपुरी प्रकल्पाचा एक गेट नंबर सात या गेटमधून 471 पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
विष्णुपुरी प्रकल्प पाण्याचे लेवल 355 झाले होते. पूर्णा परिसरात रात्रीला पाऊस पडल्याने विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. यामुळे विष्णुपुरी प्रकल्प 100 टक्के भरला विष्णुपुरीच्या एक गेटमधून सकाळी नऊ वाजेपर्यंत 410 पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात केला जात असल्याची माहिती विष्णुपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिली आहे. वरच्या भागात पाऊस उघडल्यास विष्णुपुरी प्रकल्पाचे दुपारपर्यंत गेट बंद करण्यात येईल.
त्यामुळे नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा व शेतीला पाणी जीवनदान देणारा विष्णुपुरी प्रकल्प चार वर्षानंतर प्रथमच जून महिन्यात शंभर टक्के भरला आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आल्यामुळे नांदेडकरांना चार वर्षानंतर पाण्याचा प्रश्न सुटला आहे. वरच्या भागात पाऊस पडल्यास विष्णुपुरी प्रकल्पाचे पुन्हा गेट उघडण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे.