हिमायतनगर। किनवट-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथील प्रस्तावित टोलनाक्यावर अधिगृहीत जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे महामार्ग क्रमांक 161 A वर आज दि. 14 रोजी शेतकरयांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी महामार्ग कार्यालयाकडून शेतकऱ्यांचे प्रस्तावित जमिनी करताना नाहरकत घेण्यात आले होते. त्यानुसार लागेल तेवढी जमीन महामार्गाच्या अधिपत्याखाली अधिग्रहित करण्यात आली. याला आता जवळपास चार वर्षे होत आहेत. परंतु अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला अद्यापही संबंधित शेतकऱ्यांना मिळाला नाही, उपविभागीय अधिकारी, महामार्ग कर्मचारी यांच्याकडून नेहमी टाळाटाळ करण्यात आली आहे.
अखेर या शेतकऱ्यांनी दिनांक 14 सोमवारी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. महामार्गावरील प्रस्तावित टोल नाक्यात जमीन गेलेल्या सात शेतकऱ्यांचा समावेश असून, सरसम येथील विस्तारित महामार्गात जमिन गेलेली एक शेतकरी ह्यात आहे. अशा आठ शेतकऱ्यांचे हे आंदोलन आहे, यापुढे तरी शेतकऱ्यांना अधिकारी निस्वार्थ पणे जमिनीचा मोबदला मिळवुन देतील का? का असा प्रश्न आता येथील शेतकरी करीत आहेत.
