मुखेड-नांदेड महामार्गावर इंद-भारत कंपनीजवळ वऱ्हाडी टेम्पोचा भिषण अपघात -NNL

अपघातात १ जागीच ठार,३१ गंभीर तर ४ अति गंभीर अवस्थेत....



मुखेड| मुखेड - नांदेड महामार्गावर असलेल्या सलगरा (बु) परिसरातील इंद-भारत कंपनी (विज निर्मिती प्रकल्प) जवळ दि.१५ जुन २०२१ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वऱ्हाडाचा आयचर एम.एच.०४ ई.बि.३५२५ या क्रंमाकाचे टेम्पो पलटी होवून प्रशांत जनार्दन सुर्यवंशी, वय २२ वर्ष हा जागीच ठार झाला असून, ४ अतिगंभीर तर इतर ३१ जन गंभीर अवस्थेत आहेत.

घटनेचे सविस्तर वृत असे की,उदगीर तालुक्यातील हाळी येथील वर मंडळीचे व-हाड बिलोली तालुक्यातील कार्ला येथे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने सदर टेम्पो रस्त्यावर पलटी होवून हा अपघात झाला.या अपघातात टेम्पो १० मिटर घसरत गेला.

या घटनेची माहीती कळताच मुखेड शहरातील उपजिल्हा रुग्नालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अनंत पाटील, डॉ उमाकांत गायकवाड, डॉ.देवकत्ते मॅडम, यांंच्यासह दवाखान्यातील डॉक्टर, सिस्टर, ब्रदर, वार्ड बॉय, सर्वांनी तात्काळ मानवतेच्या दृष्टिकोनातून आपघातातील जखमींना आधार दिला. प्रथमोपचार करुन २५ अति गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी