उर्ध्व मानार लिंबोटी धरणाचे पाणी लातूर शहराला देण्यासाठी होत असलेल्या मंजुरीचा निषेधार्त रस्ता रोको -NNL


लोहा|
येथे उर्ध्व मानार लिंबोटी धरणाचे पाणी लातूर शहराला पाणीपुरवठा योजना मंजुरीचा प्रस्ताव उद्या दि. 16 जून रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडण्यात येणार असून हा ठराव पारित झाला तर लोहा व कंधार तालुक्यातील लाखो शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होणार असून, या भागाचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे या निषेधार्त आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या प्रस्तावाचा जाहीर निषेध म्हणून, लोहा व कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे,जि.प.सदस्य चंद्रसेन पाटील, उपसभापती श्याम अण्णा पवार, जिल्हाध्यक्ष शेकाप योगेश पा. नंदनवनकर यांच्या नेतृत्वाखाली लोहा शहरातील भाजी मंडई चौकात आज दुपारी 3 वाजता रास्ता रोको आंदोलन करत या प्रस्तावाचा जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनास प्रमुख उपस्थिती माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब उपस्थित होते. 

यावेळी सभापती ज्ञानेश्वर चोंडे, नगरसेवक संभाजी चव्हाण,माजी नगरसेवक रमेश माळी, माजी नगरसेवक युवराज वाघमारे, माळाकोळी सरपंच मोहन शूर, जिल्हाध्यक्ष शेरू भायी, वैभव हाके, केशव तिडके, सुधाकर सातपुते, सचिन क्षिरसागर, सतीश कराळे, सिद्धू वडजे,मनोज भालेराव, माधवराव बाबर, माधवराव घोरबांड, अशोक पा. कळकेकर, शंकर माने, दत्ता बगाडे, केशव तिडके, पुडलीक पाटील, प्रसाद जाधव, अमोल गोरे, राहुल पाटील, आनंद देशमुख बाळू अंतवाड, माधव मोरे, अवधूत पेठकर,बंटी गादेकर, प्रणव वाले, अमोल गोरे सह कार्यकर्ते, शेतकरी बांधव व पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी