भोकर, बाबुराव सरोदे| वर्ल्ड व्हिजन इंडिया यांच्या वतीने तालुक्यातील १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन गटविकास अधिकारी जी. एल. रामोड यांच्या हस्ते दिनांक 15 जून रोजी दुपारी करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या बुद्धीला व सुप्तगुणाना चालना मिळण्यासाठी कोरोना मुक्त गाव या विषयावर विद्यार्थ्यांनी चित्र काढून त्यात रंग भरण करावे तालुक्यातील ३५ गावात वर्ल्ड व्हीजन इंडियाच्या वतीने वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना घर बसल्या ह्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येईल. मागील २वर्षापासून सर्व शाळा बंद असल्यामुळे मुलांचे मानसिक मनोबल खचले असून ते निराश व हताश झाल्याचे चित्र आपणास पहावयास मिळत आहे.
म्हणून वर्ल्ड व्हीजन इंडिया च्या वतीने तालुक्यातील ३५ गावांमधील विद्यार्थ्यांसाठी ही चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती वर्ल्ड व्हीजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी श्याम बाबू पट्टापु यांनी दिली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रविण गाडे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भ्रमणध्वनी क्रमांक ७०३९१०६२६३यावर संपर्क साधावा. सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी दि .१५ जुन ते १७ जुन पर्यंत चित्र काढून संबधीताकडे सादर करावे या स्पर्धकांना आकर्षक असे बक्षीस देण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवहान विनोद घोडके यांनी केले आहे .