फायनान्स कंपनीचे हप्ते भरण्यासाठी कर्जदारांमागे सतत तगादा
नांदेड| कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे गत वर्षभरापासून देशाबरोबर नांदेडातही आर्थिक चक्राची गती मंदावली आहे संचारबंदी, लॉकडाऊन वेळोवेळी करण्यात आल्यामुळे या काळात जनतेला घरातच बसून राहावे लागल्याने व्यापारी किंवा जनता दोघांडकडेही आर्थिक ताण निर्माण झाला आहे. त्यातच लॉकडाऊनच्या काळात सक्तीची कर्जवसुली सुरूच होती पण लॉकडाऊन मध्ये नुकतीच शिथिलता दिल्याने कर्जवसुली धार आणखीच तेज झाली असून... एकंदरीत परिस्थितीची दखल घेत प्रशासनाकडून लक्ष घालत फायनान्स कंपन्याकडून होणारी पिळवणूक थांबविण्याची मागणी सामान्य जनता व व्यापारी बांधवाकडून होत आहे....
बँक, सहकारी बँक, खासगी वित्तीय संस्था, महिला बचत गट, फायनान्सचे आदी संस्थांचे कर्जाचे हप्ते भरण्यास जनता असमर्थ ठरत आहे…, कोरोनाने थैमानानंतर आता लॉकडाउन च्या शिथिलतेनंतर फायनान्स कंपन्यांनी लोकांना दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. आता हप्ता आणि त्याचा दंड दोन्ही भरण्यासाठी कंपनीने वसुलीसाठी नेमलेल्या पंटरचे फोनवर फोन कर्जदाराला हैराण करत आहेत...व बळाच्या बळावर ते कर्जदारास वेठीस धरत असून वेळप्रसंगी कायदाही हाती घेत धमकावत असल्याचे प्रकार समोर येत आहेत या सर्व बाबीवर प्रशासनाचे लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस स्वप्निल इंगळे पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे..
नांदेड शहरात फायनान्सचे अनेक लहान मोठे कार्यालय असून या फायनान्सकडून अनेकांनी वस्तू खरेदी,दवाखाना किंवा दैनदिंन गरजा भागवण्यासाठी लहान मोठे कर्ज घेतले आहे. या कर्जाची वसुली दर महिन्याला ग्राहकांच्या बँक खात्यातून किंवा वैयक्तिक घरी भेटीतून केली जाते ,बँकेतून हप्ता वसूल करण्याच्या तीन ते चार दिवस अगोदर कंपल्या फोन किंवा व्हाट्सएपला सारखे मेसेज टाकत असतात, परंतु गेली एक ते दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा कोरोना व्हायरस विषाणूने संपूर्ण राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे शासनाने महामारी घोषित केली आहे. त्यामुळे सर्व काम धंदे बंद पडले आहेत.
रोजगार बंद झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला असून आता त्यांच्या वसुली करणार्या पंटरकडून ग्राहकांना फोन येत आहेत. ‘तुमचा हप्ता बाऊन्स झाला आहे.तुम्ही लगेच दंडाच्या रकमेसह हप्ता भरा, नाहीतर तुमचे सीबील खराब होईल.तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाईल, अशी तंबी दिली जात आहे. त्यामुळे अनेकांनी फायनान्स कंपन्यांचा आणि फोन करणार्या पंटरचा धसका घेतला आहे. या फायनान्सच्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामध्ये जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालावे आणि फायनान्सची वसुली करणार्यांना समज द्यावी, अशी लोकांची मागणी आहे या बाबीकडे जिल्हाधिकारी,पालकमंत्री,नेते यांनी दखल घेत फायनान्स कंपन्याकडून होणारी पिळवणूक थांबविण्याची मागणी होत आहे.
हप्त्याची अडचण तिथे दंडाची भर
याबाबत शहरात अनेक कर्जदारांनी सांगितले की, लॉकडाऊन नुकताच संपला व आताच काम धंद्याला सुरूवात झाली असून यांचे हप्ते भरण्याची इच्छा असताना घरात बंद असल्याने हप्ते थकले आहेत. वेळेवर हप्ता भरला नाही तर फायनान्स कंपनी आकारत असलेला दंड अनेकांना परवडत नाही. त्यात आता चालू हप्ते भरता आले नाहीत. हप्त्यात दंडाची अधिकची भर पडली आहे.