हिमायतनगरात जागतिक पर्यावरण दिन मान्सूनपूर्व नाल्या सफाईने साजरा - NNL


हिमायतनगर|
येथील नगरपंचायतीचे प्रशासक यांच्या आदेशांनंतर स्वच्छतेच्या कमला वेग आला असून, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरातील परमेश्वर मंदिर परिसरातील नाल्याच्या सफाईपासून मान्सूनपूर्व कामाला सुरुवात झाली आहे.  

मागील अनेक महिण्यापासून शहरातील विविध प्रभाग व श्री परमेश्वर मंदिर कॉम्प्लेक्स भागातील नाल्यांची सफाईमध्ये ठेकेदाराकडून कुचराई केली जात होती. महिन्याकाठी १५ लक्ष खर्चूनही ठेकेदार मालामाल आणि जनता दुर्गंधीने त्रस्त अशी अवस्था नागरिकांची झाली होती. आत पावसाळा जवळ आला असताना देखील ठेकेदाराने शहरातील मोठे नाले व नाल्यातील घाणीच्या सफाईल सुरुवात केली नसल्याने साथीचे आजार बळावण्याची शक्यता वादहली होती. याबाबत वाढोणा न्यूजने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मान्सूनपूर्व स्वच्छतेचे काम तात्काळ करावे अशी जनतेची मागणी व मंदिर प्रशासनाच्या विनंती करण्यात आली. 

त्यानंतर नगरपंचायतीचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी तात्काळ दाखल घेऊन स्वच्छता विभागाला सूचित केले. आणि तातडीने या सूचनेच पालन करत नपमार्फत जागतिक पर्यावरण दिनापासून परमेश्वर मंदिर परिसरातील नाली सफाईने स्वच्छतेला सुरू करण्यात आली आहे. 

शनिवारी सकाळीच 7 मजूर व सुपरवायझर राहुल कांबळे, फाहद खान, यांच्या उपस्थितीत नाल्या काढणीचे काम चालू करण्यात आले. यानंतर शहरातील विविध प्रभागात स्वच्छता करून शहराच्या कथन जाणाऱ्या मोठया नाल्या जेसीबीच्या साहाय्याने साफ करून यातील वाढलेली झाडी झुडपे काढली जाणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात वाहणाऱ्या नाल्याचे पाणी जाण्यास अडचणी होणार नाही याची पूर्णतः खबरदारी घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. 

या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावे आणि शहर स्वच्छ सुंदर करून पावसाळ्यात उदभवणाऱ्या डेंग्यू, डायरिया, मलेरिया, चिकनगुण्या सारख्या जरापासून शहरातील नाहारीकांची सुरक्षा व्हावी अशी रास्ता अपेक्षा शहरवासीयांना आहे. त्यामुळे नगरपंचायत व स्वच्छतेचा ठेका घेतलेले ठेकेदार कश्या पद्धतीने सायफसफाई करून जनतेच्या आरोग्यला सुरक्षे देते हे आगामी काळात पाहावे लागणार आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी