हिमायतनगर| तालुक्यात येणाऱ्या मौजे खैरगाव ज. गटग्रामपंचायती अंतर्गत सन २०२० - २१ वर्षात तांडा वस्ती सुधार योजनेसाठी अंदाजे ३० लाखाचा निधी मिळाला. मात्र या निधीतुन संबंधितांनी बोगस काम करून शासनाच्या निधीची पुर्ण वाट लावली आहे. त्यामुळे आजघडीला येथे करण्यात आलेली कामे हि पहिल्याच पावसात वाहून गेल्याने निकृष्ट कामाचे पितळे उघडे पडले आहे.
तालुक्यात जवळपास २० हून अधिक तांडे असताना केवळ दोनच तांडयाला निधी मिळाला तो ही लाखोंमध्ये असून, हा केवळ जाणून बुजून निधी लाटण्यासाठी केलेला खटाटोप आहे. केवळ मलिदा लाटण्याचा प्रकार बांधकाम विभागाच्या यंत्रणा व स्थानिक ग्रामसेवक, सरपंच यांनी संगनमताने कला आहे. याबाबत शिवसैनिक राम गुंडेकर यांनी सदरील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून, या कामाची चौकशी करून शासनाच्या निधी वर डल्ला मरणाऱ्यांवर कार्यवाही करावी आणि त्यांना निलंबित करावे अशी मागणी समाज कल्याण मंत्री मा. धनंजय मुंडे महाराष्ट्र राज्य मुबई यांच्याकडे केली आहे.
या अंतर्गत असलेल्या खैरगाव तांड्यात नळयोजनेच्या कामाचीही सत्ताधारी व ग्रामसेवकाने अभियंत्यांस हाताशी धरून संगनमत वाट लावली असून, नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर गावात स्वच्छता केली जात नसल्याने नागरिकांना दुर्गंधीसह घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागतो आहे. खैरगाव मध्ये जिल्हा परिषद शाळा खोलीचे बांधकाम सुरु आहे, या कामात जुन्या इमारतीचा मॉब टाकून भराव करण्याचा प्रकार संबंधितानी केल्यानंतर गावकरयांनी हे काम थांबविले आहे. हा सर्व प्रकार पाहता केवळ स्वतःची तुंबडी भरायची आणि शासनाला चुना लावून जनतेच्या डोळ्यात धूळफेक कार्याची असा उद्देशाने कामे केली जात असल्याचा आरोप तक्रारकर्ते व गावकर्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केला आहे. याबाबत संबंधित ग्रामसेवकाशी संपर्क केला असता त्यांचा फोन स्वीच ऑफ होता.