नांदेड| गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे समजताच उस्माननगर पोलिस ठाणे हद्दीतील मौजे वाका येथे पाहणी करून दोघांना ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहे.
नांदेड शहरा जवळील उस्माननगर पोलिस ठाणे हद्दीतील येणाऱ्या मौजे वाका येथे दिनांक 12 जूनच्या मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास योगेश बाळासाहेब हंबर्डे ह्यांचे शेतात शिवानंद उर्फ गजानन मारोती कोमटवार रा.रावेर नायगाव त्याचे सोबत तिरुपती नरवाडे, शंकर राठोड रा. कुष्णुर तांडा, धर्मा जाधव वैशाली गायकवाड रा. पूर्णा व इतर ३ व्यक्तींनी संगनमताने गुप्त धन काढण्यासाठी लिंबू, हळद, कुंकू नारळ बाळगून जादूटोणा करून गुप्तधन काढण्याच्या तयारी असताना ताब्यात घेतले होते.
त्यावरून आरोपींवर महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रकाराला प्रतिबंध करण्यासाठीच्या अधिनियम २०१३ चे कलम ३, अनुसूची ४ प्रमाणे उस्माननगर पोलिस ठाण्यात गून्हा दाखल केला आहे. यातील आरोपी शिवानंद कोमटवार व तिरुपती नरवाडे याना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डी.बी. भुसनुर यांनी दिली आहे.