लोहा| शहरा लगतच्या बेरळी येथील अत्यंत गरीब कुटुंबातील अरविंद रायबोले यांची एमपीएससी द्वारा डीवायएसपी म्हणून निवड झाली. त्यानंतर त्याचा वाढदिवसाच्या निमित्ताने एक शुभेच्छा एक रोपटे असा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामस्थ व मित्रपरिवार यांनी आनलेल्या रोपट्याचे रोपण केले.
तालुक्याचे भूमिपुत्र आणि गेल्या चाळीस वर्षानंतर एमपीएससी द्वारा थेट डीवायएसपी झालेले अरविंद रायबोले हे या भागातील विद्यार्थ्यांची प्रेरणा आहेत. त्यांनी सोशल मीडिया वरून' वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा म्हणून पुष्पगुच्छ किंवाहार आणण्या ऐवजी एक रोपटे घेऊन यावे असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला त्यांच्या मित्र परिवार आणि हितचिंतक, ग्रामस्थ यांनी भरघोस प्रतिसाद दिला.
सायंकाळी बेरळी (खु.) येथे दिवसभरात आलेल्या फळझाडांचे आणि इतर झाडांचे अरविंद रायबोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 'वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करायला हवे. त्याद्वारे निसर्गाशी एकरूप होण्याची संधी मिळते व आपल्या आठवणी त्या वृक्षासोबत कायमच्या जोडल्या जातात 'असा संदेश त्यांनी या निमित्ताने दिला. यावेळी कपिल रायबोले, उत्तम गायकवाड, संदीप होळगे, राम रायबोले, सिद्धार्थ रायबोले, प्रकाश रायबोले, मंगल सोनकांबळे, विशाल महाबळे, पत्रकार दत्ता कांबळे आदी उपस्थित होते.