हिमायतनगरात गौण खनिज तस्करांचे चांगभले; महसूलने केली जेसीबी व ट्रैक्टरवर कार्यवाही
हिमायतनगर| शहर व तालुका परिसरात आणि नदीपात्रातून रेतीसह, मुरूम, दगड आई गौण खनिज उत्खननाच्या नियमन बगल देऊन काढले जात आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून, याबाबत येथील पत्रकारांनी बातम्यांचा धडाका लावल्याने गौण खनिजावर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले आहे. त्यांच्या आदेशानंतर तहसीलदार कुंभकर्णी झोपेतून जागे झाले असून, दिघी, धानोरा, कोठा, भागात रेतीचे अनेक ठिकाणी साठे जप्त करण्यात आली. त्यानंतर आजच्या मध्यरात्रीला मुरुमाचे उत्खनन करणाऱ्या जेसीबीसह ट्रैक्टरवर कार्यवाही करून पोलीस ठाण्यात आणून लावले आहे. या कार्यवाहीची गौण खनिज माफियाट खळबळ उडाली असून, यावर कार्यवाही होते कि पूर्वीप्रमाणे एका वाहनावर कार्यवाही होऊन एक सोडून दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विदर्भ - मराठवाड्याच्या सीएमवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या कामारी, दिघी, विरसनी, घारापुर, रेणापूर, कोपरा, पळसपूर, डोल्हारी, एकंबा, कोठा, कोठा तांडा, बोरगडी, धानोरा, वारंगटाकळी आदी ठिकाणच्या रेती धक्क्यावरून राजकीय वरद हस्ताने काही रेतीचोरानी महसुलाच्या त्या-त्या सज्जाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, काही पोलीस पाटील व सरपंचांना हाताशी धरून जेसीबी व मजुरांच्या साहाय्याने रात्रंदिवस रेतीचे उत्खनन करून साठेबाजी केली आहे. तसेच गरजूना अव्वाच्या सव्वा दराने वाळूची विक्री व पुरवठा करून अल्पावधीत मालामाल होण्याचा प्रयत्न केला. यासाठी शेकडो ट्रैक्टर, टिप्पर चालक - मालकाचा समावेश आहे. आता पावसाळा सुरु झाल्याने रेतीचे उत्खनन करता येत नाही करतो म्हंटले तरी शेतकरी खरीप हंगामाची पेरणी सोडून रस्त्याने नदीकडे जाऊ देत नाहीत त्यामुळे साठेबाजी केलेली रेतीची विक्री करण्याचा धंदा महसूलच्या काही अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या संगनमताने राजरोसपणे सुरु आहे.
त्यामुळे झालेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी तहसीलदार याना साठे जपत करा आणि कार्यवाही करा, तसेच गाणी देखील कुठे साठे असतील तर माहिती द्या असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून, गुण खनिजाची चोरी व उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुंभकर्णी झोपेतील प्रशासन जागे झाले आहे. त्याच धर्तीवर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांचयच्या सूचनेने व तहसीलदार डी.एन.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काळ महसूलच्या तलाठ्यांनी इमाने इतबारे कार्यवाही केल्याचे पाहावयास मिळते आहे. गौण खाणीं उत्खननाचे नियम तोडून मध्यरात्रीला धानोरा- वारंगटाकळी भागात मुरुमाचे गौणखनिज उत्खननसुरु असल्याच्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी जेसीबीद्वारे मुरुमाचे उत्खनन करून ट्रैक्टरमध्ये टाकून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले आहे.
यावेळी महसुलाचे धानोरा सज्जाचे तलाठी श्री शेख आणि हिमायतनगर सज्जाचे तलाठी श्री पुणेकर यांनी जेसीबीसह एक ट्रैक्टर ताब्यात घेऊन मध्यरात्री १ वाजत हिमायतनगर पोलीस ठाण्यात आणून लावले आहे. याबाबतची नोंदणी हिमायतनगर पोलीस डायरीत मह्द्यरात्री १.२१ मिनिटाला करण्यात आली असणं, या कार्यवाहीची गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रेतीचा धंदा थोडं कमी झाल्यामुळे आता यातील काही जणांनी जेसीबीने गायरान जमीन खोदकाम करून त्यांतील मुरूम ट्रैक्टरमध्ये भरून बांधकामांना भारावला आणून टाकण्याचा धंदा चालविला आहे, आता पोलीस थंहात लावण्यात आलेल्या वाहनांवर किती दंड आकारून महसूल भरला जाईल कि मागील प्रमाणे एककार्यवाही करून एक वाहन सोडले जाईल याकडे पर्यावरण प्रेमी नागरिकांचे लक्ष लागून आहे.
एकूणच मागील चार महिन्यापासून सुरु असलेल्या गौण खनिज प्रकरणी मराठवाड्यातील महसूल विभागाने विदर्भाच्या धर्तीवर आजची कार्यवाही सर्वात मोठी केली आहे. त्यामुळे महसूलच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचे धडाकेबाज कार्यवाहीमुळे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. तसेच इतर ठिकाणी जप्त करण्यात आलेले रेतीसाठ्याचा तात्काळ लिलाव करून गरजूना हि रेती अल्प दारात उपलब्ध करून द्यावी अशी रास्त अपेक्षा घरकुल धारक व्यक्त करता आहेत. तात्काळ लिलाव झाला नाहीतर जप्त रेतीसाठी माफियांच्या घश्यात काही लालची महसूल अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या संगणमातीने गेल्यास नवल वाटणार नाही हे नव्याने सांगायला नको आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने एटीएस मोजमाप व सिसिटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी होईल का..?
तालुक्यातील पैनगंगा निडकटवरील रेती धक्क्याचा लिलाव झालेला नसताना कोणत्याही ग्रामपंचातीने उत्खननासाठी नाहरकत प्रमाण पात्र दिलेले नसताना लाखो ब्रास रेतीचे उत्खनन करून चोरी झाली हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची चौकशी व्हावी आणि शहारत येणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासावे तसेच साठेबाजी कुठे झाली यांची सत्यता पाहण्यासाठी पैनगंगा नदीकाठावरील रेती धक्क्याच्या आजुबाजुंचे व गावाशेजारी "ड्रोन कॅमेऱ्याने" चित्रण करून रेतीची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या व साठेबाजी केलेल्या ठिकाणच्या जमीन मालकावर कार्यवाही करून त्या अभय देणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकाऱ्यावर बडतर्फीची कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हाधिकारी, एसडीओ यांच्याके सामाजिक कार्यकर्त्यांने निवेदनातून केली आहे. मात्र पावसाळा सुरु झालेला असताना देखील महसूल प्रशासन सोन्याचे अंडी देणाऱ्या रेतीच्या धंद्याकडे व हा गोरखधंदा चालविणाऱ्या माफियाकडे दुर्लक्ष करून राजकीय दबावाला बळी पडते आहे कि काय..? असा संशय तक्रारदारातून व्यक्त केला जात आहे.