काळेशवर विष्णुपुरीचा गोदावरी नदीच्या पात्रात बडुन मामा भाचीचा मृत्यू - NNL


नविन नांदेड|
गोदावरी नदीच्या पात्रात काळेशवर विष्णुपुरी येथील पातात्र बुडून मामा भाची यांच्या मृत्यू झाल्याची घटना काल दि.१३ जुनं रोजी दुपारी घडली असून या प्रकरणी तात्काळ दोन जणांनी उड्या मारून दोघांनाही बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.या घटनेमुळे परिसरात हाळहाळ व्यक्त केली.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,काल दुपारी काळेशवर विष्णुपुरी नांदेड येथे बुद्धप्रिय पांडुरंग किरकण वय ३८ रा.मुकुंदवाडी औरंगाबाद व सांची चंदकांत बनसोडे वय १६ रा.वसरणी हे दोघे आले होते. यात काठावर बसलेल्या  भाची सांची हीचा पाय घसरलयाने ति विष्णुपुरी जलाशयाच्या डोहात बुडत असतांनाच मामा बुधदप्रिय यांनी ऊडी मारून वाचवण्याचा प्रयत्न केला. 

पंरतु ते दोघेही पाण्याचा डोहात बुडाले असल्याने येथील नागरिकांनी बघितले व तात्काळ शुभम लुटटे व चंदकांत लामदाडे व अन्य जणांच्या साह्याने दोघांनाही  काही वेळात बाहेर काढले व उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

या प्रकरणी  मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणी अधिक तपास प्रभारी  पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी एस.के.भोसले हे करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी