हिमायतनगर| घारापुर मार्गे अर्धापुर ते फुलसंगावी जाणारा राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदारकडून चालू आहे. ठेकेदाराने कामात संत गती चालविल्याने खैरगाव जवळील पुलाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे कला झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी थेट शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसल्याने पेरणी केलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याची चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
अर्धापुर ते फुलसंगावी राष्ट्रीय महामरागचे काम सुरु झाल्यापासून रुद्राणीच्या ठेकेदारने नाकर्तेपणाचा कळस गाठला आहे. त्यांच्या या बेजबाबदार कारभारामुळे आत्तापर्यंत दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर अनेक अपघात होऊन नागराईक जखमी झाले आहेत. असे असताना देखील कामात गती देऊन दरजा सुधारण्यात कुचराई केली जात आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्याअगोदरच तामसा भागात व इतर ठिकाणी सिमेंट कोक्रेटीकरणाला भेगा पडल्या आहेत. अश्या ढिसाळ कारभारामूळे खैरगाव जवळील पुलाचे काम अद्यापही अर्धवट आहे.
तसेच या रत्स्यावरील अनेक कामे अर्धवट असून, वाहतुकीला ये-जा करण्यासाठी म्हणावा तसा पर्यायी रास्ता नसल्याने येणाऱ्या - जाणार्यांना त्रास सहन करावा लागत आहे. आता तर या ठिकाणच्या नाल्याच्या पाणी अर्धवट कामामुळे रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात शिरून शेतीचे अतोनात नुकसान होताना दिसत आहे. केवळ ठेकेदारच्या नाकर्तेपणामुळे यास कारणीभूत असून, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई करून कोण..? देणार असा प्रश्न विचारला जात आहे.
रुद्राणी कंट्रक्शनच्या ढिसाळ कारभारामुळे या भागातील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली जाताना दिसत आहे. शेतकऱ्यांनि पेरणी केलेले पीक जमिनीमधून उगवत असताना पाण्याची लाट आली. आणि पाणी जाण्यास जागा नसल्याने शेतामधून नाल्याचा पूर येऊन उगवलेला पिकाचा कोंबळ्याचे वर पाणी वाढल्याने पिक गुदमरून जात आहे. हि बाब लक्षात घेता या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून रुद्राणी कंट्रक्शन कंपनीच्या बेजवाबदार कारणीभूत असल्याबद्दल कारवाई करण्यात यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देऊन नुकसान भरपाई मिळावा अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गजानन ठाकरे यांनी केली आहे.

