महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या कार्यासोबतची त्यांची तुलना करणं वास्तविकतेची जाण असणाऱ्यांना खटकण्यासारखं आहे. 1970 च्या दरम्यान मुंबईवरील लोकसंख्येचा वाढत जाणारा भार कमी व्हावा यासाठी मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई हे नवं शहर वसवण्याच्या दिव्य दृष्टीने तत्कालीन मुख्यमंत्री, नव्या मुंबईचे खरे शिल्पकार मा.वसंतरावजी नाईक साहेब यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी 17 मार्च 1970 रोजी सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (सिडको)ची स्थापना केली. यानंतर मा. वसंतराव नाईक साहेबांनी पनवेल, उरण आणि बेलापूर पट्ट्यातील 95 गावातील 50 हजार एकर जमीन संपादनाचा महत्वकांक्षी निर्णय घेतले. इतकच नव्हे तर पुढे येऊ घातलेल्या जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी ) साठी सिडकोच्या माध्यमातून भूसंपादन करण्याचा दृढनिश्चयही मा. नाईक साहेबांनी घेतले.
मिठागरे व शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या भागातल्या शेतकऱ्याचा या भूसंपादनास मोठा विरोध झाला. यावेळी दि.बा. पाटील हे पनवेल, उरण भागातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. त्यामुळे नवी मुंबई वसण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बाजूनेच दी. बा. पाटलांना पोटतिडकीने बोलताना बघितले गेले. पंधरा हजार एकरी जमीन घेण्याच्या प्रयत्नात शासन पर्यायाने सिडको असतांना दी. बा. पाटलांनी एकरी 40 हजार रकमेची मागणी केली. याच बरोबर यामुळे भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होणार असल्याचे म्हणत त्यांनी वेळोवेळी आंदोलने उभी केली. 1984 च्या जानेवारीला जासई गावाच्या हुतात्मा मैदानात मोठ्या संख्येने शेतकरी जमवून दि. बा. पाटलांनी नव्या मुंबईच्या भूमी अधिग्रहणास कडाडून विरोध दर्शवला.
यानंतर जेव्हा शासनाने एकवीस हजार प्रति एकरी देण्याचे मान्य केले, पुढे 27 हजारापर्यंतही आले मात्र, हा ही निर्णय सर्वमान्य झाला नाही.यानंतर पुन्हा भूसंपादनाच्या विरोधात उरण, पनवेल परिसरातील पन्नास हजारापेक्षा अधिक शेतकरी दास्तान फाट्यावर एकत्र येऊन तीव्र निदर्शने झाली यात शेतकरी अधिकारी व पोलिसात तीव्र संघर्ष झाला. यावेळी नाविलाजाने पोलिसांना लाठीचार्ज व गोळीबारही करावा लागला. यात काही शेतकरीही मारले गेले व नव्या मुंबईच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जमिन अधीग्रहनाला विरोध करणारे दी.बा. पाटील हे नव्या मुंबईच्या विमानतळासाठी योग्य नाव कसे असू शकते हा गंभीर प्रश्न आहे.
आता यापुढे केवळ जात पाहुनच नामांतरे होणार व पुतळे ऊभे राहणार का याच बरोबर नव्या मुंबईचे खरे शिल्पकार,भविष्यातील अडचण ओळखून नवी मुंबईसह सिडकोची स्थापना करणारे दुरदृष्टा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांची केवळ जात बघून त्यांच्या नावाला विरोध करणे हे सुद्धा पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणे नाही काय..? हा ही एक यक्षप्रश्न आहे. असे निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आज गोरबंजारा समाजातर्फे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी लखन जाधव (गोर सेना अध्यक्ष), गुलाब राठोड (सरपंच), राम जाधव, नितीन राठोड कांडलीकर, अतुल राठोड, विशाल राठोड, मिलन जाधव, राहुल आडे, बाबूलाल चव्हाण, ईश्वर राठोड़, विशाल आडे, आतीस आडे, आजय आडे, मारोती राठोड़, रोशन राठोड़, रवी राठोड़, चेतन जाधव, आभि राठोड, आभि चव्हाण, अनिल चव्हाण, कूणाल जाधव, आश्विन आडे, पुथ्वीराज आडे व प्रत्येक कांड्याचे नायक कारभारी उपस्थिती होते.