नांदेड| मंत्री वडेट्टीवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करावी तसेच वडेट्टीवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा द्यावी. अशी मागणी ओबीसी महासंघाने केली आहे.
ओबीसी संघटनेचे नेते बालाजी शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले असून, राजकीय आरक्षणाच्या मुद्दयावर ओबीसी समाज एकवटला असून त्याचे नेतृत्व मंत्री वडेट्टीवार करत आहेत त्यामुळे त्यांना उच्च दर्जाची सुरक्षा द्या अशी मागणी करण्यात आली आहे.