नांदेड/धर्माबाद| तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील रेल्वेच्या भुयारी मार्गात पाऊसाचे पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना व दुचाकी वाहन धारकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता.परंतु सदरील प्ररकरणाची दखल खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतल्यामुळे रेल्वेच्या भुयारी मार्गात पाऊसाचे साचलेले पाणी मोटारी द्वारे बाहेर काढण्यात आल्यामुळे सदरील रेल्वेचा भुयारी मार्ग शेतकरी व बैलगाडी ये-जा करण्यासाठी मोकळा झाल्यामुळे शेतकरी बांधवांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धर्माबाद तालुक्यातील अतकुर,समराळा व बाळापूर येथील रेल्वेच्या भुयारी मार्गात पाऊसाचे पाणी साचल्यामुळे सदरील भुयारी मार्गातून शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याचे पाहून येथील बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट घेऊन रेल्वेच्या भुयारी मार्गात पाऊसाचे साचलेले पाणी बाहेर काढण्याची लेखी मागणी केली होती. सदरील मागणीची दखल खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतली.व लगेच सदरील रेल्वेच्या तिन्ही भुयारी मार्गात पाऊसाचे साचलेले पाणी तात्काळ बाहेर काढून मार्ग मोकळा करण्याच्या सुचना रेल्वेच्या संबधित अधिकाऱ्यांना चिखलीकर यांनी दिले होते.
त्यामुळे मंगळवारी दुपारी रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी धर्माबाद तालुक्यातील अतकुर, समराळा व बाळापूर येथील भुयारी मार्गास भेट देऊन पाऊसाचे साचलेले पाणी मोटारी दवारे बाहेर काढून मार्ग मोकळा करून दिला आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी रविप्रकाश व इतर कर्मचारी यांनी धर्माबाद तालुक्यातील अतकर,समराळा व बाळापुर येथील भुयारी मार्गात पाऊसाचे पाणी भविष्यात साचूनये यासाठी उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी दुपारी प्रत्यक्ष रेल्वे गेट क्रमांक १७६,१७७ व १८१ ला भेट देऊन पाहणी केली आहे.
तसेच स्थानिक व पिडीत शेतकऱ्यांसोबत सखोल चर्चा केली व तात्काळ पाणी पम्पींग करून भुयारी मार्गातून बाहेर काढले आहे.व भविष्यात पाऊसाचे पाणी रेल्वेच्या भुयारी मार्गात साचूनये यासाठी लवकरच मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले आहे. तसेच तालुक्यातील येताळा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नेहमी इंटरनेट बंद पडत असल्यामुळे ग्राहकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता.त्यामुळे सदरील प्ररकरणाची तक्रार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे करण्यात आली होती.सदरील तक्रारीची दखल चिखलीकर यांनी घेतल्यामुळे आता येताळा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे सभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांनी सांगितले आहे.