चांगल्या रस्त्यावर डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदारचे नाव काळ्या यादीत टाका
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील नवीन आंदेगाव ते दरेसरसम या चांगल्या डांबरीकरण रस्त्यावर केवळ शासनाचा निधी लाटण्याच्या उद्देशाने नव्याने थातुर-माथूर पद्धतीने डांबरीकरण करत उखळ पांढरे करू पाहणाऱ्या ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे. अशी मागणी आंदेगाव-भूरकाडी येथील परमेश्वर यम्मलवाड, राजू यलकेवाड, अरविंद भुसावळे, राजू सुब्बनवाड यांच्यासह इतर ग्रामस्थांनी केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये मार्च एंडच्या कोट्यातील बहुतांश ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण व रस्ते दुरुस्तीची कामे चालू आहेत. कोरोना काळातही या ठिकाणी मजूर लावून उपलब्ध झालेल्या निधीची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित ठेकेदार अंदाजपत्रकाच्या बगल देऊन आपल्या मनमानी पद्धतीने रस्त्याचे कामे थातुर माथूर व बोगस पद्धतीने करून देयके उचलण्याच्या तयारीला लागले आहेत. एकीकडे सर्वसामान्य जनता कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेली असताना दुसरीकडे बाहेर कुणीच पडत नसल्याच्या या संधीचा फायदा घेत ठेकेदार ठाऊक -पॉलिश लाऊन रस्त्याचे कामे उरकून घेत आहे. असाच कांहींसा प्रकार हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव-भूरकाडी ते दरेसरसम रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावरून दिसून आला आहे.
टेभीजवळील पिपळाच्या मारोती देवस्थानपासून नवीन आंदेगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्याने ये - जा करताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते आहे. त्यापुढे असलेल्या नवीन आंदेगाव ते दरेसरसम मध्ये मागील काळात करण्यात आलेल्या जुन्या सिमेंट रस्ता वाहणाऱ्या पाण्यामुळे दाबून फुटला आहे. तर त्यापुढचा डांबरीकरण रस्ता मागील काळात करण्यात आला असल्याने सादर डांबरीकरण रस्ता अतिशय चांगला आहे. परंत्तू नव्याने सिमेंट रस्त्याबरोबर डांबरीकरण रस्ताही मंजूर करून घेऊन संबंधित ठेकेदार या ठिकाणच्या चांगल्या डांबरीकरण रस्त्यावर पुन्हा नव्याने डांबरीकरण करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून निधीची विल्हेवाट लावण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे.
[caption id="attachment_11342" align="alignnone" width="800"] हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव ते दरेसरसम हाच तो पूर्वीचा चांगला रस्ता ज्यावर ठेकेदाराने आजघडीला अर्धा इंचाचं डांबरीकरण करून शासनाचा निधी लाटण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून करण्यात आला आहे. याचे देयके थांबवावी अशी मागणी केली जात आहे. छाया -अनिल मादसवार [/caption]एवढेच नव्हे तर चांगल्या डांबरी रस्त्यावर केवळ अर्धा इंच एवढा डांबराचा सिलकोट मारून मार्चएंडच्या काळात देयके काढण्यासाठी धडपड करताना दिसतो आहे. कारण सदरचे डांबरीकरण सुरु असताना कार्यकारी अभियंता तर सोडाच उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्याने येथे भेट दिली नाही, आणि कागदोपत्री भेटी दिल्याचे दाखवीत असल्याने ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे बोगस काम करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. हा प्रकार या भागातील भूरकाडी येथील परमेश्वर यम्मलवाड, राजू यलकेवाड, अरविंद भुसावळे, राजू सुब्बनवाड यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याची माहिती पत्रकारांना देऊन रस्त्याच्या बोगस कामाचे पितळे उघडे पाडले आहे. पत्रकारांनी चार दिवसापूर्वी या रस्त्याच्या कामावर भेट दिली असता स्थानिकांच्या मजुरांना कामावर न लावता जिल्ह्याबाहेरील मजुरांना आणून कामावर ठेवल्याचे दिसून आले होते.
[caption id="attachment_11341" align="alignnone" width="800"] हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव ते दरेसरसम चांगल्या रस्त्यावर केवळ निधी लाटण्यासाठी डांबरीकरन करून शासनाचा निधी लाटण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून होत आहे. छाया -अनिल मादसवार[/caption]चांगल्या डांबरीकरण रस्त्याच्या बाजूला डांबर वितळण्याचे काम आणि रस्त्याच्या कडेला सिलकोटसाठी लागणारा गिट्टीचा ढग टाकणे सुरु होते. आज घडीला या रस्त्यावर चकाकी ठेकेदाराने अर्धा इंचाचा ऑइल मिश्रित डांबर मिक्स केलेला सिलकोड टेकवून थातुर माथूर रस्त्याचे काम उरकले आहे. एवढेच नव्हे तर कामाबाबत साशंकता उपस्थित केलेल्या युवकांनी हा डांबरीकरण केलेला रस्ता हाताने काढून पहिला तर मिनिटातच रस्ता निघून आला आहे. यावरून या रस्त्याच्या निकृष्ट कामाची पोळ खुलली आहे. या डांबरीकरण झालेल्या बोगस कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि ठेकेदारचे नाव काळ्या यादीत टाकून चांगल्या रस्त्यावर केवळ निधी लाटण्यासाठी डांबरीकरन कोणाच्या सांगण्यावरून केले. त्याच्यासह ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.