मुस्लीम समाज बांधवांकडुन कॉरोनाला आळा घालण्यासाठी मनसुरा काढा - NNL

हिमायतनगर| कोरोनाच्या विषाणूचा प्रभाव मानवी शरीरावर होऊ नये यासाठी रामबाण उपाय असलेला मालेगाव येथील प्रसिद्ध काढ्याचे वितरण आजपासून सुरु करण्यात आले आहे. सदर काढा सलग तीन दिवस घेणे अनिवार्य असून, काढ्याचे सेवन करून हिमायतनगर शहरवासीयांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन मौलाना जाहिद खासमि यांनी केले.

ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर आणि हाजी आदमजी उर्दु स्कुल मदिना मस्जिद चौपाटी येथे कोरोना संक्रमण काळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना कोरोना सारख्या आजारा पासुन दूर ठेवण्यासाठी मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने आयोजित मन्सुरा काड्याच्या मोफत वाटप शिबिराप्रसांगी बोलत होते. या शिबिराचे उदघाटन माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, नगरसेवक फेरोज खान, अश्रफ भाई, देवय्या सेठ, गजानन चायल, सावन डाके, उदय देशपांडे, आदींच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी मौलाना अब्दुल अजीज, मौलाना जाहिद खासमि, हाफिज अब्दुल अजीम, मौलाना गयास, इसाखान, मुजीब खान, अस्लम सेठ, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार, पत्रकार प्रकाश जैन, अनिल मादसवार, बबलू काळे, नागेश शिंदे, अनिल नाईक, आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.    

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, मालेगाव शहरात कोरोनाचे रूग्ण वाढल्यानंतर देशात कोरोनावरच्या इलाजावरील औषध निर्माण करण्यावर भर होता. त्याच दरम्यान मालेगाव जि. तेथिल महमदिया तिबीया कॉलेज मालेगाव डॉक्टरांच्या टिमने मनसुरा काढा तयार केला आहे. या काढ्यामध्ये नऊ प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती वापरल्या असुन, वनस्पतींची पाने, फुले, मुळ्या, यात आहेत. हा काढा शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतो. डॉ. इरफान यांच्या टिमने हा काढा बनवला आहे. तो पुर्ण रित्या आयुर्वेदिक असुन, माणसांची रोग प्रतिकार शक्ती वाढवतो, काढा बनवणाऱ्या टिमने कोरोनावर खात्रीशीर इलाज आहे अस म्हटल नाही तर यामुळे काहींना आजारा पासुन दुर राहण्यास मदत झाली आहे. लोक यास मनसुरा काढा किंवा मालेगांव काढा नावाने ओळखतात, हिमायतनगर शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन अंशी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने या काढायचे तीन दिवस मोफत वितरण करत आहोत. सर्वानी हा काढा घेऊन आपले व कुटुंबाचे रक्षण करावे असे आवाहनही त्यांनी केले. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी