हिमायतनगरात घाणीचे साम्राज्य; कोरोनाकाळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात - NNL

ठेकेदाराकडून होत असलेल्या स्वच्छतेच्या कामाची चौकशी करून दंडात्मक कार्यवाही करा

हिमायतनगर| शहरात घाणीचे साम्राज्य वाढत असून, दुर्गंधीमुळे आणि सध्या सुरु असलेल्या कोरोना काळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तात्काळ याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ठेकेदाराकडून होत असलेल्या स्वच्छतेच्या कामाची चौकशी करून दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी भाजपच्या वतीने तहसील प्रश्नाला निवेदन देऊन करण्यात आली आहे.

हिमायतनगर शहरात मंजिल कहाणी महिन्यापूर्वी नागरपंचायतीवर प्रशासक लागू झाले आहे. तेंव्हापासून शहराच्या नागरी समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसापासून शहरातील मुख्य रत्स्यावरील पथदिवे नगरपंचायत प्रश्नाने देयके न भरल्यामुळे बंद झाली आहेत, याकडे दुर्लक्ष होत असताना आता शहरातील स्वच्छतेकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील नालये सफाई, रत्स्याची घाण, केरकचरा, साफ करण्याचा ठेका पल्लवी इंटरप्रायजेसला १५ लक्ष रुपयात देण्यात आलेला आहे.

तरीदेखील सबंधित ठेकेदार म्हणावे तसे मनुष्यबळ आणि वाहने नं वापरता थातुर माथूर पद्धतीने साफसफाईचे काम करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. त्यामुळे शहरातील नाल्यातील घाण वाढली असणं, कोरिया काळात सर्वातर स्वच्छता ठेवण्याचे असताना शहरात घाणीचे साम्राज व दुर्गंधी पसरल्याचे पाहावयास मिळत आहे. आठ - आठ , पंधरा - पंधरा दिवस ठेकेदारचे कर्मचारी नाल्या सफाईला येत नसल्याने नसल्याने नागरिकांना आपल्या घरासमोरील नाल्या स्वतः साफ कराव्या लागत आहेत. याबाबतचे व्हिडीओ , फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यांनंतरही ठेकेदार स्वतः हजार न होता नांदेडला राहून उंटावरून शेळ्या हाकत आहे.



त्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना इतर आजाराची भीती सतावत आहे. हि बाब अनेकांनी लक्षात आणून दिल्याने हिमायतनगर भाजपाच्या वतिने नायब तहसीलदार विकास राठोड यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आली आहे. तात्काळ स्वच्छतेच्या कामाची चौकशी करून देयके रोकण्यात यावे आणि शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अन्य ठेकेदाराला ठेका देऊन निष्कळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाढोणा न्यूजशी बोलताना सांगितले. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष खंडु चव्हाण, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, युवा उपाध्यक्ष बालाजी ढोणे, सरचिटणीस परमेश्वर सुर्यवंशी, मोदी सपोर्ट संघ तालुकाअध्यक्ष विनोद दुर्गेकर, सो. मि. सेल बुथ प्रमुख टेंभूर्णी विश्वनाथ देवसरकर आदि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी