कोरोना लसीकरण व रुग्णांच्या बाबतीत घेतला आढावा
हिमायतनगर, अनिल मादसवार | माझे यापुढील जीवन स्वतःसाठी नाही तर जनहितासाठी अर्पण आहे, असे म्हणणारे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयास आपल्या निधीतून हृदय रुग्णांसाठी मशिनरी उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांनी दि.२६ मार्च रोजी हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन हृदय रोगाशी संबंधित या मशनरीचा शुभारंभ केला.
सध्या हिमायतनगर तालुक्यात कोरोनाची संख्या वाढत आहे, आजघडीला ८८ रुग्ण बाधित असून, अनेकजण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर ग्रामीण रुग्णालयात येणाया रुग्णांना अनेक सुविधा उपलब्ध नसल्याने विशेषतः हृदयाच्या सबंधित रुग्णांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. याबाबत नागरिकांच्या मागणीवरून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ मिळावा म्हणून लाखो रुपयाच्या निधीतून हृदयाशी सबंधित असलेल्या डी फैब्री लिटर मशीन, इसीजी मशीन, मल्टी प्यारा मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत.आज त्यांनी रुग्णांच्या प्राथमिक उपचाराच्या या सर्व मशिनरीचा शुभारंभ करून गरजू रुग्णांनी शासकीय रुग्णालयात उपचार करून घ्यावा से आवाहन त्यांनी केले. तसेच लवकरच येथील रुग्णालयाच्या पाणी प्रश्न निकाली निघणार असून, यासाठी बोअर, मोटारपंप, मिनरल वॉटर मशिनही बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जवळगावकरांनी ग्रामीण रुग्णलयात सुरु असलेल्या कोवीड - १९ लसीकरणाचा आढावा घेतला. तसेच कोविड केयर सेंटर पूर्ववत चालू करून दिल्याने आज या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण दाखल करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दत्तात्रेय गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी जवळगावकरांनी लसीकरण घेणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच नागरिकांनी कोरोनाला न घाबरता उपचार करून घ्यावा आणि आजारांनी ग्रस्त असलेल्यानी कोरोना लास घ्यावी तसेच नियमांचे पालन करावे आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार मास्क, सैनिटायजर, सोशल डिस्टन्स ठेऊन आपल्याशी कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डी डी गायकवाड, डॉ.नाईक, डॉ.उमरेकर, माजी कृउबा संचालक रफिक सेठ, शहराध्यक्ष संजय माने, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान, गुत्तेदार बाखी सेठ, फिरदोस खान, आरोग्य कर्मचारी रमेश धांडे, फार्मसीस सुकरे, पत्रकार अनिल मादसवार, दिलीप शिंदे, विष्णू जाधव, अनिल नाईक, आदींसह रुग्ण व त्यांचे नातेवाईकांची उपस्थिती होती.