कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली ७
हिमायतनगर| शहरात कोरोनाचा प्रसार वाढू लागला सून, शनिवारी ४ रुग्ण आढळल्यानंतर रविवारी नांदेडला शिफ्ट झालेल्यांची तपासणी केली असता आरटीपीसीआर तपासणीद्वारे हिमायतनगरचे ३ नवीन कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत.
आज नांदेड जिल्ह्यात १७० कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल आला असून, त्यामध्ये आरटीपीसीआर व अँटिजेन तपासणीद्वारे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात हिमायतनगर शहरातील ३ जणांचा समावेश असून, आता बाधित रुग्ण संख्या ७ झाली आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरातील नागरिकांनी आवश्यक त्या उपाययोजना करून कोरोना या विषाणू पासून दूर राहण्यासाठी सपंर्क टाळावा. कोणत्याही नागरिकांच्या संपर्कात न येता विशेष काळजी घेऊन ५० वर्ष वयाच्या वृद्ध व १० वर्षाखालील लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नये. तसेच घरातील कोणीही व्यक्ती घराबाहेर येऊ नये कारण तरुण व्यक्तीच्या माध्यमातून कोरोनाचे विषाणू घरी जाऊन घरातील लहान ब्लॅक व वृद्धांना बाधित करण्याची शक्यता आहे. म्हणून काळजी घेणे हाच एकमेव उपाय असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायकवाड यांनी सांगितले आहे.
तसेच कोरोनाचा वाढत प्रसार लक्षात घेता उद्यापासून हिमायतनगर शहरातील कॉंटेन्मेन्ट झोन मधील बाधित झालेल्या लोकाच्या संपर्कातील, ज्यांना काही आरोग्य विषयी तक्रार असेल त्यांची कोविड अँटिजेन रॅपिड टेस्ट करून घेणार आहोत. या तपासणीतून ताबडतोब रिझल्ट कळणार आहे. यामध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तात्काळ शिफ्ट करण्यात येणार असल्याने ज्यांना अँटिजेन रॅपिड टेस्ट करायची त्या नागरिकांनी स्वतःहून टेस्ट करून घ्यावी आणि आपल्या कुटुंबियांचे रक्षण करावे असे आवाहनही वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायकवाड यांनी केले आहे.