आ. माधवराव पाटील जवळगावकर बरे व्हावेत म्हणून चाहत्यांच्या प्रार्थनांचा पाऊस

हिमायतनगर|
आमदार माधवराव पाटील जवळगावकर याना करोनाचा संसर्ग झाला. ही बातमी समजताच साहेबांच्या चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. साहेब लवकर बरे व्हावेत म्हणून प्रत्येक कार्यकर्ते मनोभावे भगवंताची प्रार्थना करत भावना व्यक्त करत नवस बोलत आहेत. काही कार्यकर्त्यांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही प्रार्थना केली.
   
कार्यकर्त्यांच एवढ प्रेम आपल्या नेत्याला त्याने दिलेल्या प्रेमामुळेच मिळत हे आज सिद्ध झाले आहे. आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेबांचा काळ हा सतत संघर्षाचा राहीलेला आहे. या काळात त्यांनी कार्यकर्त्यांना /सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन ही संघर्षांची खिंड लढवली.( अजून संघर्ष संपलेला नाही.) ज्या दिवशी साहेबांनी आमदारकीची शपथ घेतली त्या दिवसापासून सतत कार्यमग्न आहेत. आपल्या आमदारकीचा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत लाभ मिळावा म्हणून सतत प्रयत्न करणारे आमदार म्हणून नावलौकिक ही मिळवले.
      
लोकनेता कसा असावा याचा प्रत्यय साहेबांच्या माध्यमातून येत आहे. लॉकडाउनच्या काळात सतत आपल्या मतदारसंघाची पालक या नात्याने पालकांसारखी काळजी, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घेतली. याच कामाची पावती आज जनतेने साहेबांप्रती दाखवलेले प्रेम. हे प्रेम असच दिवसेंदिवस वाढत राहो.. साहेब लवकर बरे होऊन घरी येवोत हीच ईश्वर/अल्लाहकडे प्रार्थना. 

....शेख मुखिद खडकीकर, हिमायतनगर, जी.नांदेड.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी