पंतप्रधान नरेंद्र मोदी ,भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ,
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राज्यपाल कौशारी
यांच्यासह अनेक दिग्गजांनी केले अभिष्टचिंतन
नांदेड| नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय खासदार तथा जॉईंट किलर प्रतापराव पाटील चिखलीकर यांना वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल कौशारि यांच्यासह नांदेड, महाराष्ट्रसह देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि आप्तेष्टांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.खा. चिखलीकर यांचे अभिष्टचिंतन करीत दीर्घायुष्य आणि लोकसेवेच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
महाराष्ट्रातील राजकारणात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अत्यंत चर्चेत राहिलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस कोरोणा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खा. चिखलीकर यांनी स्वतः रद्द केला होता. हार-तुरे आणू नयेत , बॅनरबाजी करू नये असे आवाहनही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले होते .शिवाय वाढदिवसानिमित्त गरजूंना सैनीटायझर चे आणि मास्कचे मोफत वाटप करावे असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि हितचिंतकांना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले होते .त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करत खा. चिखलीकर यांच्या चाहत्यांनी ,कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोफत सॅनिटायझर चे वाटप आणि वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा केला.
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कौशरी यांच्यासह आ. अभिमन्यु पवार औसा, विधानसभेचे सचिव श्री सागर ,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील , औरंगाबादचे समजत सेठ छाजेड, खा.राकेश सिंह ,माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार पाशा पटेल, विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय अर्थमंत्री अर्जुन सिंग ठाकूर , म्हाडाचे अधिकारी तथा जिल्हा अधिकारी अरुण डोंगरे ,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा ,आमदार भीमराव केराम, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर ,मुख्य अभियंता पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर , माजी आमदार पाशा पटेल, आमदार राजेश पवार, माजी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर ,माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ,भाजपाचे प्रवक्ता गणेशराव हाके ,माजी आमदार विनायकराव पाटील अहमदपूरकर ,माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा ,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवार.
पोलिस महासंचालक मुंबई संजय लाटकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मुंबई पंकजराव देवरे ,निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी पुणे संतोष जाधव, सहाय्यक आयुक्त मुंबई संजय शिंदे, माजी मंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर , कुलगुरू श्री भोसले , माजी आमदार डॉक्टर बालाजी कीनिकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,आ. डॉ. तुषार राठोड, भाजपाचे महानगर अध्यक्ष प्रवीण साले, यांच्यासह नांदेड महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अभिष्टचिंतन केले, शुभेच्छापत्र एस एम एस करून, फोन करून, सोशल मीडियावर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांचे अभिष्टचिंतन केले.
खा.चिखलीकरांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खा.चिखलीकरांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेवून वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते.जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून भाजपा कार्यकर्यानी खा.चिखलीकर यांचा वाढदिवस साजरा केला. दरवर्षी खा.चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री वसंतनगर येथील त्याच्या साईसुभाष निवासस्थानी कुटूंबातील सदस्य व नातेवाईकांनी खा.चिखलीकरांचे वाढदिवस साजरा करण्याची परंपरा आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिखलीकर कुटूंबियांनी वाढदिवसाचा सोहळा रद्द केल्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी पहिल्यांदा सामसूम होते.
खा.चिखलीकर यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मानवतावादी धोरण स्विकारून गोरगरीबांना अन्न धान्याचे वाटप, मास्क, सँनेटायझरचे वाटप, रक्तदान शिबीर, व झाड लावणे,पत्रकारांचा विमा काढून वाढदिवस साजरा करण्यात आला. भोकर येथे भाजपाचे जिल्हा उपाध्यश दिलीपराव सोनटक्के यांच्या पुढाकारातून खा.चिखलीकर यांच्या वाढदिवसी गोरगरीबांना अन्न धान्याचे किट, मास्क व सँनेटायझरचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.या कार्यक्मास भोकर भाजपा तालुकाध्यश किशोर पाटील लघळूदकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.