जिल्ह्यातील ४१४ किमी च्या ग्रामीण रस्त्यांचा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड|
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीन अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध भागात  ४१४ किलो मिटर च्या नवीन रस्ते तयार करण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत समावेश करण्यात आला आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडे यासाठी पाठपुरावा केला होता.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने नागरिकांना प्रवास करणे अथवा दळणवळणासाठी ही मोठी अडचण येत आहे . अनेक भागातील रस्ते उखडून गेल्यामुळे रुग्णाना दवाखान्यात पोहोचविण्यासाठी सुद्धा अडचणी येत आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि दळणवळणासाठी रस्ते विकास हा एकमेव मार्ग असल्याने ग्रामीण भागाची नाळ पक्क्या रस्त्याने शहरांना जोडली पाहिजेत या अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन मध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, नांदेड, लोहा, नायगाव, बिलोली, कंधार, अर्धापूर, मुदखेड, मुखेड, भोकर, उमरी आणि देगलूर , किनवट, हदगाव, हिमायतनगर तालुक्यात तब्बल ४१४ किलोमीटर चे रस्ते मंजूर करावेत अशी मागणी केली होती. यासाठी सतत पाठपुरावा केला होता.

यात धर्माबाद प्र.जि.मा.- ३९ (करखेली) ते सालेगांव तालुका सीमा रस्ता ५ किमी,
धर्माबाद रा.मा.-२६०(धर्माबाद) बाभळी पाटोदा खुर्द रोशनगांव प्रजिम (भाग बाभळी ते रोशनगांव प्रजिमा ४२) रस्ता ७, धर्माबाद प्र.जि.मा- ८३ ते चोळाखा चोंडी ते प्र.जि.मा. ४२ रस्ता ७ किमी,
नांदेड रा.म.मा.- २२२ ते भालकी चिखली बु.एकदरा रस्ता  ६. ८० किमी,
नांदेड नाळेश्वर ते ढोकी वाघी सुगांव, खु.रस्ता ७.५० किमी, नांदेड सुगांव खु. ते वाडी बु.ते रा.मा.-६१ रस्ता५.१२ किमी, लोहा बामणी (पट्टी उस्माननगर) जवळा दगडगाव शेवडी रस्ता ११ किमी, लोहा खेडकर वाडी रामन्याचीवाडी हाडोळी (जहांगीर) रस्ता ८. 00 किमी, ९ लोहा पार्डी पिपंळगांव ढगे धानोरा पोखरी रस्ता
१० किमी, १० नायगांव बरबडा ते चुंगराळा सावरखेड रस्ता ९.५०, नायगांव गोळेगांव ते खंडगांव ते कोपरा ते मरवाळी- मरवाळी तांडा १०. ७० किमी,

नायगांव प्र.जि.मा- ४६ ते इकळीमोर हंगरगा ते परडवाडी सांगवी ११.८० किमी, नायगांव मरवाळी ते माहेगांव ते कारला तम रस्ता ७.५० किमी,
बिलोली कोल्हे बोरगांव ते बेळकोनी ते सावळी रस्ता ८. ०० किमी, बिलोली रा.म.मा. १६१ ते आळंदी रस्ता ५. ०० किमी, बिलोली कोटग्याळ ते कारला बु. ते रा.म.मा. १६१ रस्ता ७.५ किमी,
रा.मा. २५५ (औराळा) ते काटकळंबा ते तालुका सीमा नायगांव रस्ता ९.५ किमी, 
जंगमवाडी ते फुलवळ ते मुंढेवाडी ते वाखरड रस्ता ७.८५ किमी,  अर्धापूर रा.म.मा. २२२ ते शेळगांव खु. ते तालुका सीमा रस्ता ४.२४ किमी, अर्धापूर रा.मु.मा-६१ ते सावरगांव कोंडा ते देळूब बु. रस्ता ४.४२ किमी, अर्धापूर रा.मु.मा-२२२ ते पिंपळगांव महादेव ते तालुकासीमा.रस्ता ४.९० किमी, मुदखेड मुदखेड ते हज्जापूर- हज्जापूर तांडा चिकाळा तांडा रस्ता ८ किमी,

मुदखेड प्र.जि.मा-८३ ते रोही पिंपळगांव वसंतवाडी रा.मा.-२६१ पर्यत रस्ता ६ किमी , मुदखेड प्र.जि.मा-८३ ते दरेगांववाडी - पांगरगांव- गोपाळवाडी रस्ता ८.५१ किमी, ८ किमी, भोकर बोरगांव ते थेरबनाते राममा -१६१ रस्ता ८ किमी, भोकर | रा.मा.-२५१ ते लांबकानी ते हाडोळी ते कामनगांव रस्ता ७.११ किमी, भोकर | रा.म.मा.-१६१ ते ताटकळवाडी ते शिंगारवाडी ते इ.जि.मा.- १४८ रस्ता ५.१८ किमी,
भोकर बोरवाडी ते समंदरवाडी ते जांभळी ते तालुका सीमा ते वरदडा रस्ता ७.१५ किमी, 
मुखेड प्र.जि.मा- ९२ ते राजुरातांडा -राजुरा -अंबुलगा रस्ता ६ किमी, 
मुखेड तालुका सीमा जांब खु.ते होंडाळा -सावरगांव- देवला तांडा रा.म.मा.-१६१
ए भवानी तांडा ते जांभळी रस्ता १६ किमी, अंबुलगा ते ठाणा रस्ता ५ किमी,
उमरी रा.मा-२६० ते शेलगांव रेल्वे स्टेशन पळसगांव तांडा कारला-कारला तांडा रस्ता ७.८३ किमी,उमरी प्र.जि.मा.३५ -सांवरगांव कला ते हुंदा (उमरी पटटी) रामखडक बाचेगांव बोळसा खु.- बोळसा बु. ७.८३ किमी,उमरी : रा.मा-२५१ ते निमटेक तालुका सीमा रस्ता ५.०५ किमी, 

देगलूर प्र.रा.मा.-०७ ते झरी पेडंपल्ली देवापूर येरगी राज्य सीमा रस्ता १३.५०
देगलूर : रा.म.मा.१६१ ए ते हानेगांव बिजलवाडी तांडा रस्ता ८.३५ किमी,  देगलूर प्र.जि.मा. ७२ ते किनी दावणगीर तांडा मरखेल वळग रस्ता ४.९९ किमी, किनवट तालुक्यातील ३८ किमी,  हदगाव तालुक्यातील ३५ किमी, हिमायतनगर तालुक्यातील २५ किमी, माहूर तालुक्यातील १७ किमी असे ४१४ किमीचे रस्ते मंजूर करण्याची मागणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्तवाचून होणार त्रास कमी होणार असून त्या भागातील रस्त्यांचा कायापालट होणार असल्याने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नागरिकांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी