हिमायतनगर| सत्य साईबाबांचे निस्सीम भक्त श्री कैलास माने पोटेकर यांनी हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांना निरोगी जीवन लाभावे आणि या कोरोना महामारीतून लवकरात लवकर बाहेर पडावे अश्या प्रकारचे साकडे घातले आहेत.
हदगाव -हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचा कायापालट करून सत्त्तेचा खरा उपयोग जनतेला व्हावा यासाठी अहोरात्र झटून आली कर्तव्यदक्षता सिद्ध करणारे आ.माधवराव पाटील जवळगावकर याना जनसेवा कार्याना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना मुंबई येथील ब्रीचकैंडी या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर मागील ३ ते ४ दिवसापासून उपचार सुरु असून, त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड झाले आहेत.
एवढेच नव्हे तर आज रक्षाबंधनाच्या दिवशी येथील महिला डॉक्टर व सिस्टर्सनी राखी बांधली आहे. त्यामुळे जवळगावकर लवकरात लवकरत सुदृढ होऊन परत येतील अशी सर्वाना अपेक्षा आहे. असे असले तरी अनेक कट्टर समर्थक आपापल्या परीने आ.जवळगावकर यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत आहेत. त्यापैकी एक कट्टर समर्थक तथा पोटा नगरीचे कार्यकर्ते कैलास माने पोटेकर यांनी सुद्धा श्री सत्यसाईबाबांना साकडे घालून लवकरात लवकर आमच्या कर्तव्यदक्ष आमदारांना बरे करावे आणि पूर्ववत पुन्हा जनत्तेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी प्रार्थना केली आहे. एकूणच जवळगावकरणचे समर्थक आणि मतदार संघातील चाहत्या महिला-पुरुष, अबाल वृद्ध नागरिकांचे आशीर्वादाने नक्कीच जवळगावकर निरोगी होऊन परत येतील असे सर्वाना खात्री आहे.