नांदेड| सोमवारी झालेल्या नारळी पौर्णिमेच्या पर्वावर सर्वच बहिणींनी आपल्या भावला रक्षा बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी दिली.या पर्वातील सर्वात जास्त लक्ष खेचणारा क्षण होता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात घडलेला त्यात पोलीस उप निरीक्षक राणी भोंडवे यांनी पोलीस उप निरीक्षक शेख असद यांना बांधलेली रक्षा.कोठे आहे हो जातीचा फरक तो आपल्या मनात असतो, त्याला तिलांजली देण्याची नक्कीच गरज आहे.हजारो रक्षा बंधनात भाव खाणारा हा क्षण अनेकांना आपल्या जीवनातील बदल करण्यास बाध्य करणार आहे.
सोमवारी रक्षा बंधनाचा पर्व साजरा झाला.सर्वानीच आप आपल्या परीने यात आपले योगदान दिले.किंबहुना ते अपेक्षितच होते.सर्वात जास्त आनंद देणारा क्षण आपल्या देशाच्या सीमा रक्षण करणाऱ्या जवानाला कश्मीर भागातील मुस्लिम बहिणींनी बांधलेल्या राख्या हा आहे.सोबतच आपल्या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षेचे वचन घेणाऱ्या क्षणांना कमी मानता येणार नाही.ते सुद्धा आपले रक्षकच आहे.सीमेवरील जवान शत्रूंपासून आपले रक्षण करतात.जिल्ह्यात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी समाजातील शत्रूंपासून आपले रक्षण करतात याची जाणीव आमच्या बहिणींना आहेच.काल अनेक फोटो पाहिले सर्वानी आपल्या परीने रक्षाबंधन पर्व साजरा करून कोरोनाने दिलेले दुःख विसरून आनंद घेतला.
पण सर्वात जास्त भाव खाणारे छायाचित्र दिसले नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील आहे.नांदेड जिल्हा पोलीस दलातील दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस उप निरीक्षक राणी भोंडवे या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शोध पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक शेख असद यांना बांधलेली रक्षा.मुळात राणी या स्वतः इतरांना रक्षा पुरवण्यासाठी कार्यरत आहेत. मग त्यांना रक्षा कवच बांधण्याची काय गरज आणि ती रक्षा शेख असद यांना बांध्याची तर नक्कीच गरज नसावी. पण एक विचारवंत सांगतो, 'तमाम उम्र चिरागो के आसपास रहे,हमारे दौर के जुगनू मगर उदास रहे ! कठिन है दौर जरुरी है आदमी बनना,हमारा कोई धरम नहीं कोई लिबास नहीं !!' बहुधा या वाक्यांचा प्रभाव असेल, कारण रक्षा कोणीही करो पण भारतीय संस्कृतीने रक्षा कवच भावाकडे मागण्याची शिकवण दिली आहे. राणी भोंडवे आणि शेख असद यांच्यात झालेला रक्षेचा देवाण घेवाणीचा विषय नक्कीच मनाला भावणारा आहे. हा क्षण सर्वाना कळवा, त्यातून सर्वानी काही तरी नवीन प्रक्रिया सुरु करावी आणि समाजाला नवीन दिशा मिळावी असा शुद्ध हेतू या लिखाणात आहे. जीवनातील नाते कसे तयार होतात, कसे अंकुरित होतात, कसे सांभाळले जातात आणि कसे विखुरले जातात यावर एक विचारवंत सांगतो, रिश्ते.....अंकुरित होते है प्रेम से, जिंदा रहते है संवाद से, महसूस होते है संवेदनाओं से, जिये जाते है दिल से, मुरझा जाते है गलत फहमियों से, और बिखर जाते है अहंकार से. म्हणून सर्वानी राणी भोंडवे यांनी शेख असदला बांधलेल्या रक्षेच्या अर्थाला मानाने समजून घ्यावे असे नक्कीच सांगायचे आहे.
....रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड