बजरंग दलाचे तालुका संयोजक गजानन चायल
गेल्या १३ वर्षांपासून येथील बजरंग दल शाखेच्या वतीने सहस्रकुंड धबधबा ते हिमायतनगर (वाढोणा) अशी पाई कावड यात्रा काढली जाते. त्यासाठी तिसऱ्या श्रावण सोमवारच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी हजारो कावडधारी युवक आणि स्वयंसेवक सहस्रकुंड येथील महादेव मंदिरात एकत्र जमतात. या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर महाआरती आणि अभिषेक व मार्गदर्शन केले जाते. सोमवारी सकाळी पैनगंगा नदीत डुबकी मारून म्हणजे गंगास्नान करून येथील महादेवाचे दर्शन घेऊन हर हर महादेव.. जय श्री राम नामाच्या जयघोष करत हाती भगवे झंडे व कावड आणि अनेक भजनी मंडळ टाळ - मृदुंगाच्या गजरात सहभागी होऊन हि यात्रा हिमायतनगरकडे प्रस्थान करते अशी येथील परंपरा आहे.
परंत्तू यंदा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे वैश्विक महामारीने उद्रेक केल्याने शासनाच्या ताळेबंदीच्या नियमाचे पालन करून हि कवाड यात्रा खंडन न पडू देता काढली जाणार आहे. कोरोनामुळे जास्त संखीने कावडधारी सहभागी होण्यास प्रशासनाची मनाई असल्याने मोजकेच कावडधारी यात सहभागी होऊन सोमवारी सकाळी दुचाकीवरून सहश्रकुंड येथे जातील आणि त्या ठिकाणी गंगास्नान करून येथील जागृत महादेवाला जलाभिषेक करत परत दुचाकीने कावडधारी परत येतील. या ठिकाणी आल्यानन्तर येथील श्री परमेश्वरसह शहरातील सर्व देवी देवतांना जलाभिषेक करून आपल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या पायावर जल टाकून आशीर्वाद घेतील. या दरम्यान कावडधारी विश्वातून कोरोना महामारीचे संकट टळू दे अशी ईश्वराकडे व प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना करतील त्यानंतर कावड यात्रेची सांगता केली जाणार आहे. कोरोनामुळे जास्तीच्या संख्येला परवानगी नसल्याने शहर व तालुक्यातील बजरंगीनी याची नोंद घेऊन आपण आपल्या घरीच ईश्वराची प्रार्थना करावी. आणि कावड यात्रेला गर्दी करू नये असे आवाहन बजरंग दलाचे तालुका संयोजक गजानन चायल यांनी केले आहे.