किनवट| किनवट तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. एकूण बाधितांच्या संख्येत आज शनिवारी (दि.08) दोन नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे, ती आता 50 झालेली आहे. कालच्या बाधितांमध्ये नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजय चाडावार यांचा समावेश आहे.
शनिवारच्या प्राप्त अहवालात 49 वर्षीय गंगानगर मधील एक पुरूष व अॅन्टिजेन चाचणीत वेलमापुरा येथील एक 60 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे वेलमापुरा, सराफा लाईन व गंगानगर हे भाग कंटेनमेंट घोषित झाले आहेत. सध्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये 17 तर शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये 15 अशा एकूण 32 रुग्णावर उपचार चालू असून, त्यांची प्रकती स्थिर आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासन तथा आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्यात असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.