शिक्षक काँग्रेसच्या मागणीला यश
लोहा| शिक्षकांना कोरोना काळात कोविड सेंटरवर ड्युट्या देण्यात आल्या होत्या. या संदर्भात शिक्षक काँग्रेस च्या वतीने आवाज उठविण्यात आला शिवाय निवेदने देण्यात आली. त्याची राज्यसरकारने दाखल घेत कोरोना ड्युटीतून नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांची मुक्तता झाली. शिक्षक काँग्रेसच्या मागणीला अखेर यश आले. असे शिक्षक काँग्रेसचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण लोव्हेकर यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यात अडीच ते तीन हजार शिक्षक बी एल ओ म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची ड्युटी 'करोना सर्वे 'साठी लावण्यात आली कोवीड १९ तपासणीसाठी ते गावागावात कर्तव्य पार पाडत होते नागरिकांस सर्दी, ताप खोकला याची माहिती व तपासणीचे काम शिक्षकांना होते करत होते .या कोवीड 19 च्या कामातून शिक्षकांना मुक्त करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचे राज्य अध्यक्ष कालीदास माने यांनी उपसंचालक कार्यालय लातूरकडे केली होती. आरटीई नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत असे शासन आदेश असतांना प्रशासनाने कोवीड -१९ साठी आपल्या शिक्षकांना या कामाचे आदेश दिले.
पण प्रशासनाने त्यांच्या आरोग्याची कसलीही हमी घेतली नव्हती. यामुळे शिक्षक चिंतातूर होते. तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांचे Online क्लास घेण्यासाठी यामुळे अडचणी निर्माण होत होत्या तसेच शाळेत प्रवेश देणे, टीसी देणे, प्रवेश निर्गम देणे आदी महत्वाचे कामे खोळंबली होती. या सर्व बाबीचा विचार करुन शिक्षक काँग्रेसच्या मागणी केली होतीं. लातूर विभागातील नांदेड लातूर व ऊस्मानाबाद या जिल्हातील शिक्षकांना कोवीड - १९ च्या कामातून कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हाचे शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना दिले आहेत. हे फक्त शिक्षक काँग्रेसच्या लढ्याचे यश होय असे शिक्षक काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष विठ्ठल चव्हाण लोव्हेकर यांनी दिली .