एकूण रुग्ण संख्या 1986 तर दोन रुग्णांचा मृत्यू
नांदेड| कोरोना विषाणू संसर्गामुळे आज नांदेड जिल्ह्यात दोन रुग्णांचा उपचारा दरम्याने मृत्यू झाला असून, एकूण मृताची संख्य 83 वर पोहचंली आहे. आज पुन्हा कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांनी शतक पार केले असून 147 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 1986 झाली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये दत्तनगर येथील 48 वर्षीय पुरुष व चिरागगल्ली येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज प्राप्त झालेल्या 1281 अहवालापैकी 1088 अहवाल निगेटीव्ह तर 147 अहवाल पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या 1986 झाली आहे. नांदेडसह अर्धापूर, देगलूर, धर्माबाद, लोहा, कंधार, हदगाव, नायगाव, बिलोली यासह निजामबाद व परभणी येथील रुग्णांचा समावेश आहे.
आज मुखेड कोविड केंअर सेंटर 22, कंधार कोविड केअर सेंटर 4, बिलोली कोविड केअर सेंटर 1, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 20 आणि जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर 1 असे एकूण 48 रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे रुग्णालयातून उपचार घेवून सुट्टी मिळालेल्या रुग्णांची संख्या 935 झाली आहे. आता 957 रुग्णांवर नांदेड शहर आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. यातील सात महिला आणि आठ पुरुष अशा 15 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर यांनी दिली.