कोरोना सर्वेक्षणात जिल्हावासियांनी स्वत:हून पुढे यावे - जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर

सेवाभावी संस्थांनी सर्व्हेक्षण टीमला करावे सहकार्य

नांदेड| कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेले व ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे तसेच ज्यांनी विदेशातून, इतर राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून प्रवास केला आहे अशा सर्व व्यक्तींची तपासणी मोहिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेत निर्देशित केलेल्या व्यक्तींनी तपासणीसाठी स्वतःहून पुढे यावे व तपासणी पथकाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी केले आहे. 

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रेस, टेस्ट व ट्रिट या त्रिसुत्रीचा वापर करुन जिल्हा प्रशासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे.  यासाठी तालुका स्तरावर सर्वेक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणामध्ये इन्फ्लूएन्झा influenza सदृश्य आजार अशी व्यक्ती, कोविड-19 ची प्राथमिक लक्षणे असतील अशी व्यक्ती किंवा विदेशातून प्रवास करुन आलेली व्यक्तींची मोबाईल व्हॉनद्वारे जलद अँटिजेन टेस्टींग Rapid antigen testing तपासणी करण्यात येईल. या तपासणी दरम्यान ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये तात्काळ उपचार सुरु केले जातील. तसेच ज्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत परंतू प्राथमिकदृष्ट्या कोविड लक्षणे दिसून येत आहे अशा नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येईल.

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून “मिशन ब्रेक द चेन” ही मोहिम नांदेड जिल्हा प्रशासनाने हाती घेतली असल्याचे डॉ यांनी सांगितले. कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन अशा व्यक्तींची कोविड विषाणू संसर्गाची तपासणी आरोग्य विभागाचे डॉक्टर, आशा वर्कर व एएनएम यांच्यामार्फत केली जात आहे.

कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. सद्यस्थितीत कार्यरत मनुष्यबळ लक्षात घेता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, राजकिय पक्षाचे प्रतिनिधी, विविध संघटना, सामाजिक संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करतांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी संयुक्तरित्या दिलेल्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेने सर्वेक्षणामध्ये इन्फ्लूएन्झा influenza सदृश्य आजार असणारी व्यक्ती, कोविड-19 ची प्राथमिक लक्षणे असतील अशा व्यक्ती किंवा विदेशातून प्रवास करुन आलेली व्यक्ती असतील अशांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या पुढील https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfMaWXSpUH5QA2Ys4yGrRWu9bI2wzzmfSZjB7-s-dMHzMsEeg/viewform फॉरमॅटवर भरावी आणि वैयक्तिकरित्या कोणाला कोविड-19 सदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी या लिंकवर वैयक्तिकरित्या माहिती भरावी. असेही  नांदेड जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी