"त्या" दुर्देवी घटनेत वर्ग मित्राचे फोटो मोबाईल मध्ये पाहताच दुःख अनावर झाले

'आई' कोरोना जर आले नसते तर माझा मित्र माझ्या सोबत राहिला असता

शिवणी|
गावापासून पासून केवळ ९ कि.मी अंतरावर असलेले चिखली(ई) येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी विध्यार्थींचे पाण्यात बुडुन दुर्देवी मृत्यूची घटना तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत वाऱ्यासारखी पसरली ह्यात त्या तिन्ही बाल विद्यार्थ्यांचे पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला. एक पत्रकार म्हणून काम करत असताना ह्या घटनेचे दुःख छातीवर ठेवून ह्या घटनेची नोंद सर्वात आगोदर नांदेड न्युज लाइव्हने घेऊन वृत्त प्रकाशित केले होते.  

त्या बालकांचा अंतविधी करून घरी आल्यावर मी आंघोळीला बसल्यावर माझा मुलगा चि. नागेश कारलेवाड ह्यांनी अचानक जोरजोरात रडणे सुरू केले. मी व माझ्या पत्नीने त्याला रडण्याचे कारण विचारले असता तो सांगतच नव्हता की का रडतोय? थोडा वेळ झाल्यावर पुन्हा विचारले असता रडत रडत तो सांगू लागला की बाबा विवेक वर्धनी इंग्रजी माध्यम शाळेतील चौथ्या वर्गातला माझा वर्ग मित्र रितेश आता मला कधीच भेटणार नाही. असे रडू रडू सांगू लागला आणि पुढे म्हणाला की आज जे चिखली येथे तीन मूलं पाण्यात बुडून मृत्यू पावले. त्यातील एक मुलगा माझा वर्ग मित्रा होता रितेश नावाचा मुलगा माझा जिवलग मित्र असून, तो वर्गात हुशार विद्यार्थी होता. मी सतत त्याचा सोबत रहायचो वर्गात शिक्षण विषयी मला काही कळले नाही. तर मी रितेशला विचारात होतो आणि ते सहज पणे अवघड प्रश्नाचं उत्तर द्यायचा. आम्ही जेवणासाठी दोघे एकाच ठिकाणी बसायचो माझी भाजी तो घ्यायचा आणि मी त्याची भाजी घ्यायचो. तो एखाद्या दिवशी सुट्टी मारला तर त्या दिवशी मला करमायचे नाही. 

शाळा सुटीच्या एक दोन दिवस आम्ही खूप मजा केलो आणि कोरोना काळात मला रितेशला भेटायला जायाचे इच्छा निर्माण झाली होती. पण बाबा तुम्ही आगोदरच धावपळीचा जीवन जगत असता त्यामुळे मी तुम्हाला रितेशला भेटायला जायचे असे सांगू शकलो नाही. आणि लवकरच शाळा सूरु होतील असे अधून मधून ऐकण्यात येत होते. त्यासाठी लवकरच मित्राची भेट होईल असे वाटले होते. पण अचानक बाबाच्या मोबाईल मध्ये रितेशसह इतर दोन मुलाचा पाण्यात बुडुन मृत्यूची घटना आणि त्यात माझ्या  मित्राचे फोटो पाहटाच काळजाला चक्क धक्काच बसला. असे नागेशची प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्या व पत्नीच्या डोळ्यातून दुःखाच्या आश्रू वाहू लागल्या. आम्ही सर्व जण ओल्या अश्रूंनी श्रद्धांजली वाहिल्या आणि ईश्वर रितेशसह इतर दोन बालकांच्या कुटुंबाना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना केली.

....प्रकाश कार्लेवाड, शिवणी, ता.किनवट, जी.नांदेड. 

1 Comments

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी