NEWS FLASH आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज, मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता, अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी, बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप, प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदान, ..., **

मंगलवार, 18 जून 2019

लायगो प्रकल्पामुळे अनेक संधी उपलब्ध होणार - पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधकांना

नांदेड| भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने औंढा (ना.) येथे लायगो प्रकल्प उभारण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान हे अतिप्रगत आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थी आणि संशोधकांना नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संध्या उपलब्ध निर्माण आहेत. त्यामुळे या
विद्यापीठातील संशोधकांना अनेक संध्या उपलब्ध होणार आहेत, असे मत भारत सरकारच्या अणुउर्जा विभागाचे माजी अध्यक्ष तथा राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी आज मंगळवार, दि.१८ जून रोजी विद्यापीठास विशेष भेट दिली. यादरम्यान त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या समवेत विद्यापीठ परिसरातील विज्ञानांतर्गत येणाऱ्या भूशास्त्र संकुल, रसायनशास्त्र संकुल, जैवतंत्रशास्त्र संकुल आणि भौतिकशास्त्र संकुलास भेट दिली. तेथील प्रयोगशाळेमधील विविध यंत्राची पाहणी करून विद्यापीठाच्या प्रगतीचे कौतुक केले. यानंतर विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि संशोधक विद्यार्थी यांच्यासमवेत त्यांनी संवाद साधला.याप्रसंगी त्यांच्या समवेत व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी, व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ.वैजयंता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे डॉ.काकोडकर म्हणाले, विद्यापीठाने शैक्षणिक दर्जा वाढविण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांचे सर्वार्थाने प्रगती होण्यासाठी नियमांच्या चौकटीत राहून विकास साधावा. संलग्नित महाविद्यालयांना स्वायत्ता मिळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असावे. स्वतंत्र विद्यापीठ उभारण्यासाठी मदत करावी.

उपस्थितांशी चर्चासत्रादरम्यान व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ.वैजयंता पाटील, डॉ.गजानन झोरे, डॉ.निशिकांत धांडे, डॉ.राजाराम माने, डॉ.तेहरा यांनी काही प्रश्न विचारले. त्याप्रश्नाला उत्तर देतांना विद्यापीठातील नवोक्रम केंद्राला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अनुदान देण्याची विनंती मान्य केली. तसेच जेनेटीक मॉडिफिकेशन (गुणसूत्रीय बदल) तंत्रज्ञानाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी संशोधकांनी पुढाकार घ्यावा व संशोधन विकसित करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी आपल्या प्रास्तावनेमध्ये विद्यापीठाच्या पंचवीस वर्षातील विकासात्मक आराखडा सादर केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ.अरविंद सरोदे यांनी केले. यावेळी विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलाचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं: