सरपंच पदावर नसताना खोटी सही मारून बचत गटाची फसवणूक करणाऱ्यांची चौकशी करा

कंधार (सचिन मोरे) कंधार तालुक्यातील संत सखुबाई महिला बचत गट बोरी (खु.) ह्यांनी बचत गटास ओळख व रहिवाशी नसताना सरपंच म्हणून खोटी सही करून शासनाची ब सावित्रीबाई फुले महिला बचत गट बोरी या बचत गटाची फसवणूक केली आहे. त्या बद्दल चौकशी करून दोषी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी सावित्रीबाई महिला बचत गट बोरी(खु.) ता. कंधार च्या अध्यक्षा सुनीता रामकिशन पंदनवड व
सामाजिक कार्यकर्ते रामकिशन पंदनवड यांनी सहायक पोलिस निरीक्षक मालकोळी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की सखुबाई महिला बचतगट मौजे बोरी(खु.) ह्यांनी बचत गटाच्या फाईलमध्ये ओळख व रहिवाशी प्रमाणपत्रावर  गटाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या खोटे प्रमाणपत्रावर सरपंच म्हणून इरबा बाबुराव जयभाये यांनी दि. ३० मे २०१० या कालावधीत सरपंच नसताना बोगस शिक्का तयार करून रहिवाशी व ओळख प्रमाणपत्रावर सही मारली. त्या कालावधीत जुने सरपंच मागासवर्गीय गटाचे होते. त्यांचे नाव सौ. सत्यभामाबाई आंबादास कांबळे असून ते २०१० ला सरपंच पदावर होते. त्यांची स्वाक्षरी न घेता खुद्द सरपंच म्हणून इरबा जयभाये यांनी स्वाक्षरी केली आहे. बोरी (खु.) येथील ग्रामपंचायत निवड सन २०१5 मध्ये झाली. नवीन सरपंचाची निवड सुद्धा २०१5 साली होऊन सरपंचपदी इरबा जायभाये हे विराजमान झाले. सखुबाई महिला बचत गटाच्या फाईलमध्ये ३० मे २०१० चे इरबा बाबुराव जयभाये ह्यांनी चार वर्षे आगोदर स्वतःच्या सहीचे ओळख व रहिवाशी प्रमाणपत्र गटामध्ये जोडले आहे. 

सदरील संत सखुबाई महिला बचत गटामध्ये मराठवाडा ग्रामीण बँकेच्या पासबुकावर खाडाखोड आहे. व भाडे पावतीवर देविदास देवबा जायभाये हे पंचायत समितीला कंधार येथे सेवक म्हणून आहे. त्यांच्या भाडेपावतीवर खुद्द गटाचे अध्यक्ष प्रतिभा शिवाजी जयभाये यांनी सही मारली. भाडे पावतीवर साक्षीदार इरबा बाबुराव जायभाये व शिवाजी गोविंद जायभाये हे आहेत. त्या भाडे पावतीची व मराठवाडा ग्रामीण बँकेच्या पासबुकाची चौकशी करून गटाची संपूर्ण बोगस फाईल हि गटाला केरोसीन परवाना मिळानेसाठी कंधार तहसील कार्यालयात दि. ३० एप्रिल २०१५ रोजी संत सखुबाई महिला बचत गटाची फाईल दाखल केली आहे. संत सखुबाई महिला बचत गटाने खोटी फाईल हायकोर्ट औरंगाबाद येथे याचिका क्र. २५३३६/२०१६ मध्ये रिट दाखल केली आहे. ह्या गटाचे हायकोर्ट औरंगाबाद ब शासनाची फसवणूक केली आहे. त्या बद्दल चौकाशी करून सखुबाई महिला बचत गट मौ.बोरी (खु.) चे अध्यक्ष व सचिव तसेच सरपंच इरबा जायभाये व शिवाजी गोविंद जयभाये यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सावित्रीबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सुनीता रामकिशन पंदनवाड यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी