माळेगाव यात्रेत यंदाही धनगर समाजाचा महामेळावा

धनगर समाज विकास परिषदेचे गणेश हाके यांची माहिती 
लोहा (हरिहर धुतमल) दक्षिण भारतात प्रसीद्ध असलेल्या माळेगाव यातत्रा १६ डिसेंबर पासुन सुरुवात होत आहे. या यात्राकाळात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या धनगर समाज विकास परिषदेकडुन धनगर समाज जागर महामेळाव्याचे आयोजन दि १८ रोजी करण्यात आले आहे. या महामेळाव्याचे उद्दघाटन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय तथा  राज्य मंत्रीमंडळातील मंत्री व आमदार, खासदार उपस्थीती राहणार आहेत अशी माहिती आयोजक भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली . 

माळेगाव म्हणजे भटक्या विमुक्त जमाती व तसेच धनगर हटकर समाजाची प्रती पंढरी म्हणुन ओळखली जाते .दरवर्षी राज्यभरातुन मोठ्या संख्येने धनगर समाज आपले दैवत असलेल्या श्री क्षेत्र खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येत असतो, मागील काही वर्षांपासुन धनगर समाज विविध मागण्यांसाठी संघर्ष करत आहे, सताधाऱ्या कडून आपल्या मागण्या लवकर मंजुर व्हाव्यात म्हणुन मागील तीन वर्षापासुन गणेश हाके यांच्या पुढाकारातून माळेगाव यात्रेत धनगर समाजाच्या प्रश्नासाठी मेळावा घेतला जातो आहे. यानिमिताने समाज एकत्र करुन सरकारकडे मागण्या मंजुर करून घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. मागील दोन वर्षापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका स्पष्ट केली होती. यावर्षीही प्रलंबित मागण्यांसाठी त्याच्या पाठ  पुरावा करण्यासाठी या महामेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे.

माळेगाव तीर्थक्षेत्राचा विकास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यानंतर ठप्प झाला आहे. या यात्रेला विलासराव देशमुख यांच्याकडुन राजाश्रय मिळाला होता. त्यांनी माळेगावच्या विकासासाठी निधी दिला होता मात्र. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दोन वर्षापुर्वी धनगप समाज महामेळाव्यात जाहीर केलेला निधी मिळाला पण अद्याप कामे सुरू झाली नाहीत. यावर्षी तो निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असे गणेश हाके यांनी सांगीतले. शिवाय या महामेळाव्यास येणार्या मंत्र्यांकडुनही मोठा निधी यात्रेला आपण मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहीती त्यांनी दिली. मेळाव्याचे उद्घाटन राज्याच्या ग्रामविकासमंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार असुन, या महामेळाव्याला केंद्रीय सामाजीक न्यायमंत्री थावरचंद गहेलोत, केंद्रीय आदीवाशी विकास मंत्री ना जेअुल ओराम, केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर, खा विकास महात्मे, खा सुनील गायकवाड, आ प्रताप पाटील चिखलीकर, आ तुषार राठोड, आ नारायन पाटील, आ रामहारी रुपनर, आ रामराव वडकुते, माजी आ गोविंद केंद्रे यांच्यासह मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.

या महामेळाव्याच्या माध्यमातुन धनगर समाजाच्या धनगर आरक्षण, चराऊ कुरणे मिळणे, भटक्या विमुक्तांसाठी आश्रम शाळा व वस्तीगृहे निर्माण करणे, शेळी मेंढी महामंडळास निधी देणे, वसंतराव नाईक महामंडळास निधी उपलब्ध करुन देणे आदी प्रमुख मागण्यांसह ईतर काही मागण्या सरकारकडे करण्यात येणार असल्याची माहीती भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा आयोजक गणेशदादा हाके यांनी दिली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी