NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

शुक्रवार, 24 नवंबर 2017

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या निळ हरणाचा अखेर मृत्यू

वनअधिकारी, कर्मचारी व डॉक्टरचे प्रयत्न निष्फळ  

हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील सरसम बु. शिवारात चारण्यासाठी निघालेल्या हरणाच्या  कळपापैकी एका निळं जातीच्या हरणास मोकाट कुत्र्यांनी गंभीररीत्या जखमी केल्याची घटना दि.२२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली होती. त्या जखमी हरणावर कामारी येथील पशुधन विकास अधिकारी डाॅ. कदम यांनी उपचार करून प्राण वाचविले मात्र अधिक धास्ती घेतलेल्या हरणाचा रात्रीला मृत्यू झाला आहे. वनअधिकारी व डॉक्टरांनी केलेले शर्तीचे प्रयत्न करूनही ते निष्फळ ठरले आहेत.
यंदा पावसाळ्यात झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यात नदी नाले कोरडेठाक पडली आहेत. तालुका परिसरातील कुठल्याही नाल्यामध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने काही वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. असाच एका हरणाचा कळप सरसम बु.शिवारातील भागात हरणाचा चारण्यासाठी बाहेर पडला. दरम्यान एका निळं जातीच्या हरणाला काही कुर्यानी लक्ष करून त्याचा पाठलाग केला. यावेळी हरीण सैरावैर धावत सुटली, यापैकी एका निळ जातीच्या हरणावर कुञ्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. हा प्रकार लक्षात येताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी हरिणाला कुञ्याच्या तावडीतून सोडवून वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला, माहिती मिळताच  वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच तात्काळ कामारीचे पशुधन विकास अधिकारी डाॅ.कदम याना पाचारण करून जखमी हरिणावर उपचार केला. अतिशय गंभीर झाल्यामुळे कुत्र्याच्या हल्ल्यात हरिणाचा एक पाय निकामी झाला होता. याची धास्ती हरिनाने घेतल्यामुळे पुढील उपचारासाठी नांदेडला नेण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. वन प्रशासनाने सदर हरणास वाचविण्यासाठि वण्यप्रेमी नागरिक, डॉक्टरांच्या मदतीने शर्तीचे प्रयत्न केले. परंतु सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरले असून, वन्यप्राण्यांसाठी जंगलात ठिकठिकाणे पाणवठे उभारून सुरक्षा करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.  

याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी सौ.संध्याताई डोके यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या कि,  हरीण जास्त जखमी झाल्याने त्याचा पाय निकामी झाला होता. डॉक्टरांनी उपचार केले, गंभीर परिस्थिती असल्याने पुढील उपचारासाठी आम्ही नांदेडला घेऊन जाण्याच्या बेतात होतो. हरिनाची जात हि अतिशय भित्री असते. जखमी हरिनाने कुत्र्याची अधिकची धास्ती घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून हरणाचे प्रेत शासकीय निमानुसार पंचासमक्ष जाळून नष्ठ करण्यात आल्याची माहिती त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.   

कोई टिप्पणी नहीं: