घरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण

मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) तालुक्यातील प्रधानमंत्री आवास व राज्य पुरस्कारीत योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, पारधी घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, व आदी घरकुल योजनांसाठी प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समिती मार्फत आॅनलाईन करणे चालू असून गेल्या आठ दिवसांपासून सदर साईड बंद असल्यामुळे तालुक्यातील सर्व लाभार्थी हैराण झाले आहेत.

संबंधित कार्यलयामार्फत वरील घरकुल योजनांच्या लाभर्थ्यांचे प्रस्ताव हे आॅनलाईन करण्याचे काम चालु असून दि.१८ नोहेंबर २९१७ पासून ते अद्यापपर्यंत काम करण्यासाठी संबंधित साईड लाॅगींग केल्यानंतर काॅमप्यूटर स्क्रीनवर- टाइम आऊट एकस्पाईड, टाईप आऊट प्रेड, इल्सप्रसेड प्रेओर अबटाईनींग कनेक्शन फ्राॅम द फुल दिज मे हॅव आॅकुडेट बिकाउस आॅल पुलेड कनेक्शन वेअर युस मॅक्स पुल साईज वाॅज रिचड असा मॅसेज येत असल्यामुळे घरकुल योजनांच्या संदर्भातील कामे करणे अशक्य होत असल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्व महिला व पुरूष लाभार्थी त्रस्त झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  या संदर्भात विषेश लक्ष देऊन सदरिल घरकुल योजनांची रखडलेली कामे सुरळीत होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून याविषयी दखल घेण्यात यावी अशी प्रतिक्रिया तालुक्यातील घरकुल योजनांच्या लाभर्थ्यांनी केली आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी