नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांची बांधणी केली जावी - ना. चंद्रकांत पाटील

खड्डे बुजविणे हे नियमीत काम डिसेंबर महिन्याचेच आहे
नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्हा महामार्ग या प्रमुख महामार्गावील खड्डे बुजविण्याची मोहिम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतली असून ही मोहिम 15 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. प्रथमच राज्याचे बांधकामंत्री खड्डे व्यवस्थीत बुजविले जात आहेत की, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी दि. 22 रोजी ना. चंद्रकांत पाटील नांदेड दौऱ्यादरम्यान आले असता त्यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी बोलत असताना सांगितले.

शासकीय मिनी सह्याद्री विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आ. हेमंत पाटील, आ. डॉ. तुषार राठोड, उपसचिव के.टी. पाटील, औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता मुकूंद सुरकूटवार, नांदेड अधीक्षक अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता विवेक बडे, शंकर तोटावाड, माधव शंकपाळे, अहमद हुसेन पठाण, व नांदेड विभागातील सर्व उपअभियंता, शाखा अभियंता बंडू कुलकर्णी, दाडगे, भायेकर, सुदेश देशमुख, व इतर अधिकारी, कर्मचारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ना. पाटील म्हणाले, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम दरवर्षी डिसेंबर महिन्यातच केले जाते व हे नियमीत काम आहे, ते अधिकाऱ्यांनी केले पाहिजे. यामुळे रस्ते वाहतुकीसाठी चांगले राहतील व नागरिकांना याचा त्रास होणार नाही. जिल्हा परिषदेकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करण्यात यावीत. खड्डे बुजवत असताना प्रत्येकांनी स्वत:ची जबाबदारी समजून चांगल्या प्रकारे खड्डे बुजवावेत, अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दररोज ठरवून दिलेल्या कामाला कंटाळा न करता ते काम नियमीतपणाने करावे, आलेल्या संचिका तात्काळ निकाली काढून समोर ढकलावेत जेणे करून कर्मचारी, अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी प्रत्येक विभागातील व्यक्तींनी घ्यावी.


जिल्हा परिषदेकडून हस्तांतरित करण्यात आलेले रस्ते हे पुर्वीप्रमाणेच कामे करण्यात यावीत, बहुतांश रस्ते हे काळ्या मातीच्या पट्‌ट्यातील असल्यामुळे हे रस्ते लवकर खराब होतात. या रस्त्यावरून जाणारी जड वाहतुक, गौण खनिजाची वाहतुक व मर्यादेपक्षा जास्त वजनाच्या क्षमतेची वाहतुक या रस्त्यावरून जात असल्याने काळ्या मातीच्या पट्‌ट्यातील रस्ते लवकर खराब होतात. हे रस्ते खराब होऊ नयेत म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर या रस्त्यांसाठी करण्यात यावा यामुळे ही रस्ते जास्त काळ टिकून राहतील अशा सुचना ना. पाटील यांनी यावेळी दिल्या. याचबरोबर रस्ते व इतर इमारतीच्या देखभाल दुरूस्तीची सन 2014-15 व 2016-17 या वर्षांतील प्रलंबित देयके जानेवारी 2018 च्या अखेरपर्यंत देण्यात येतील, तसेच 2014 च्या देयकासंदर्भात कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल, तसेच खात्यामार्फत पुर्ण करण्यात आलेल्या इमारती तात्काळ हस्तांतरीत करण्यात याव्या अशा विविध प्रकारच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली व ना. चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना काही सुचनाही देऊन दर्जेदार कामाबरोबरच वेळेत काम पुर्ण करावे असे सांगितले.

काम उत्कृष्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुंबईत होणार सन्मान
राज्यभर खड्डे बुजविण्याची मोहिम सुरू असून हे खड्डे दोन वर्षे टिकली पाहिजेत, बुजविलेल्या खड्‌ड्यांची कालमर्यादा दोन वर्षांची असून चांगले खड्डे बुजविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुंबई येथे यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती ना. चंद्रकांत पाटील यांनी दिली. यामुळे नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा यथोचित सन्मानात समावेश असावा असा सुचक सल्लाही अधिकाऱ्यांना या बैठकीदरम्यान केले आहे. यामुळे किती जणांचा मुंबईत यथोचित सन्मान होणार हे आता डिसेंबरअखेरनंतर पहायला मिळणार. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी