मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) लहूजी साळवे कर्मचारी महासंघ व पुरोगामी शिक्षक समिती मुखेडच्या वतीने संविधानिक मूल्य आणि सामाजिक अनुकुलता व परिवर्तन चळवळीतील आव्हाने आणि लसाकमची भूमिका या विषयावर कामगार नेते फारुक अहमद व लसाकमचे पुर्व महासचिव बालाजी थोटवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जि. प. हा. मुलींची शाळेच्या सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती पि. एल. दाडेराव यांनी दिली.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमाने दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसात संविधान लिहून देशाला २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केले. म्हणून भारताची ओळख एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी राष्ट्र आहे. संविधान दिनाचा गौरव तथा जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरवून त्यासाठी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु करून या तालीमखाण्यात अनेक क्रांतिकारकांना प्रशिक्षण देऊन इंग्रजांच्या विरूद्ध बंड ठोकणारे क्रांतीगुरू लहूजी साळवे यांची जयंती निमित्त याव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष दिलीपराव देवकांबळे, उद्घाटक शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर तोटरे तर स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड हे अाहेत. प्रमुख पाहूणे लसाकमचे जिल्हाध्यक्ष मारोतराव डोणगावकर, मराठवाडा सचिव निरंजन तपासकर, शिक्षक संघटनेचे राज्यकोषाध्यक्ष भागवत पाटील, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष गौतम काळे, माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, नगरसेवक नासरखा पठाण, माजी नगरसेवक उत्तम बनसोडे, बालाजी कडमपल्ले, मुख्याध्यापक जी.सी.चव्हाण, प्रितम गवाले, तुळशीराम केंद्रे, शिवाजी कराळे, रमेश बर्दापूरे, पञकार संघाचे कार्याध्यक्ष शेख रियाज, हेमंत घाटे, पंकज गायकवाड, नागनाथ गायकवाड, लखन गायकवाड, शिवाजी गायकवाड, प्रदीप गायकवाड, समीर गजगे, भाऊसाहेब गायकवाड आदी उपस्थित राहणार आहे.